Ajit Pawar On Anti Muslim Statements | मुस्लिम विरोधी वक्तव्यावरून अजित पवारांचा इशारा; म्हणाले – “जाती-धर्माविरुद्ध बोलून…”

Ajit Pawar

पुणे: Ajit Pawar On Anti Muslim Statements | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली आहे. लोकसभेला भाजपशी (BJP) युती केल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटापासून (Ajit Pawar NCP) मुस्लिम मतदार दुरावल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मुस्लिम समाजाला (Muslim Samaj) पुन्हा जवळ करण्यासाठी अजित पवार प्रयत्न करताना दिसत आहेत.

महायुतीत जागावाटपासह (Mahayuti Seat Sharing Formula) विविध मुद्द्यांवरून मतभेद होत असल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लीम समाजाबाबत होणाऱ्या वक्तव्यांवरून संताप व्यक्त केला आहे.

” एखाद्या समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल कोणीतरी अतिशय वाईट बोलतो. मात्र आम्ही अशा गोष्टींशी सहमत नाही. आमचा अशा गोष्टींना विरोध आहे. मतभेद असू शकतात, मात्र एखाद्या समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही “, असा इशारा अजित पवार यांनी आळंदी (Alandi) याठिकाणी बोलताना दिला आहे.

महायुतीतील भाजप नेते (BJP Leaders) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासह अन्य काही नेते विविध घटनांवर बोलत असताना मुस्लीम समाजावर आक्रमक भाष्य करत असतात. असं असतानाच आता अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. ” जाती-धर्माविरुद्ध बोलून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल “, असं त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांच्या या भूमिकेवर महायुतीतील मित्र पक्ष असलेले भाजप आणि शिवसेना शिंदे गट कितपत सहमत असतील हे येणारा काळच सांगेल. मात्र विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अजित पवारांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed