Ajit Pawar On Baramati Assembly | ‘बारामतीला मी सोडून कोणीतरी आमदार मिळायला पाहिजे’, अजित पवारांचे सूचक वक्तव्य; म्हणाले – “जिथं पिकतं तिथं विकत नसतं…”

बारामती : Ajit Pawar On Baramati Assembly | आगामी विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Assembly Election 2024) महायुती (Mahayuti) तसेच महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कंबर कसली आहे. पक्षांकडून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. लोकसभेला महायुतीला राज्यात मोठा फटका बसला. बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha) अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांना महायुतीकडून तिकीट देण्यात आलं होतं. मात्र, सुप्रिया सुळेंसमोर (Supriya Sule) त्यांचा पराभव झाला. खुद्द अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मताधिक्य मिळालं.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांवर याचा परिणाम होणार असे अंदाज वर्तवले जात होते. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं सांगितल्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलं. त्याचसंदर्भात अजित पवारांनी आज बारामतीमध्ये बोलताना भाष्य केलं.
अजित पवार म्हणाले, ” बारामतीत आपण सर्वांगीण विकास केला. राज्यात सर्वाधिक निधी दिला. मीही एक माणूस आहे. मला कधीकधी विचार येतो की एवढी सगळी कामं करूनही बारामतीकर वेगळा निर्णय घेऊ शकतात. आता मलाही राजकारणात ३३-३४ वर्षं झाली आहेत. मी तर आता दुसरा खासदार राज्यसभेवर पाठवू शकतो.
त्याआधी संसदीय समितीनं सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेलांना (Praful Patel) उमेदवारी दिली होती. मध्ये राजेश विटेकरला आमदार केलं. शिवाजीराव गर्जेंना (Shivajirao Garje) केलं. आता राज्यपाल नियुक्त आमदारांचं काय होतंय माहिती नाही. पण जर यंदाच्या निकालांसारखी गंमत होणार असेल तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणायचं”, अशी टिप्पणी अजित पवारांनी केली.
ते पुढे म्हणाले, ” आता मीही ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं.
एकदा बारामतीकरांना मी सोडून कुणीतरी आमदार मिळायला हवा.
मग तुम्ही १९९१ ते २०२४ च्या माझ्या कारकिर्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकिर्दीची तुलना करा.
मी कधी वेगळी भूमिका घेतली नाही. तरी निवडणुकीच्या वेळी काय झालं तुम्ही बघा.
काहीजण बेताल वक्तव्य करतात. पण अशा वक्तव्यांचं कधीच आम्ही समर्थन केलं नाही.
सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारानं एक विधान केलं त्याचाही आम्ही निषेधच केला.
सगळ्यांना मतं मांडण्याचा अधिकार घटनेनं दिला आहे”, असंही अजित पवारांनी नमूद केलं.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा