Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये – पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन
पुरबाधित एकता नगरीचे पुनर्वसन करण्यासाठी सहा एफएसआय (FSI) विचाराधीन
पुणे – Ajit Pawar On Builders In Pune | नैसर्गिक नदी, नाले आणि ओढ्यांवर अतिक्रमण झाली आहेत. त्यामध्ये राडारोडा टाकला जातो. बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक प्रवाहांवर अतिक्रमण करू नये, असे आवाहन करतानाच पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुरामुळे बाधित होणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीच्या (Ekta Nagari Sinhagad Road) पुनर्वसनासाठी सहा एफएसआय (FSI) देण्याचे विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले.
सिंहगड रस्त्यावरील राजाराम चौकातील (Rajaram Bridge Chowk Flyover) सुमारे 520 मी. लांबीच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण 15 ऑगस्टला अजित पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal), भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir), राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale), अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (Prithviraj B P), प्रकल्प अधिकारी युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh) आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, की गावांचा समावेश आणि नोकरी, शिक्षणामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. यामुळे वाहतुकीचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी महापालिका, PMRDA, पीसीएमसी (PCMC), पोलीस प्रशासनाला (Pune Police) प्लॅंनिंग करण्याचे आदेश दिले आहेत.
लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक पाहिजेत. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रश्न न्यायालयात आहे. त्यामुळे निवडणुका थांबल्या आहेत.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल (Rajaram Bridge Chowk Flyover) ते फन टाईम (Fun Time Multiplex ) दरम्यान अडीच की.मि. चा उड्डाणपूल होत आहे. त्यापैकी राजाराम चौकातील एका भागाचे काम झाले आहे. विकास करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांनी नेहमी सहकार्य केले आहे. मार्च पर्यंत उर्वरित पुलाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास मिसाळ यांनी व्यक्त केला. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले.
लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) सव्वा कोटी महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्ट पर्यंत पैसे जमा होतील.
बुधवारी 35 लाख आणि गुरुवारी सुट्टी असतानाही 50 लाख महिलांच्या बँक खात्यात
या योजनेतील पैसे जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे अजित पवार यांनी यावेळी जाहीर केले.
सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सूर असल्याने गेले काही दिवस प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
राजाराम चौकातील उड्डाणपूल सुरू झाल्याने कोंडीची दहा ते पंधरा मिनिटे कमी होणार आहेत.
दरम्यान दांडेकर पुलापासून राजाराम पुलापर्यंत रस्ता दुभाजकाच्या बाजूला प्रचंड धूळ साचली आहे.
या धुळीमुळे प्रचंड प्रदूषण होत असून याठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छता झाली नसल्याने कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा