Ajit Pawar On Eknath Shinde-Devendra Fadnavis | शिंदे-फडणवीसांवर अजित पवारांची नाराजी, म्हणाले – “…तर आमच्या कार्यकर्त्यांना आवरायला अडचणीचं जाईल”
नागपूर : Ajit Pawar On Eknath Shinde-Devendra Fadnavis | मागील काही दिवसांपासून महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. सातत्याने भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group) अजित पवारांना लक्ष्य केले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) पुढील दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच महायुतीत (Mahayuti) वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे.
नागपूरच्या रामगिरी येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत मित्र पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. तानाजी सावंत आणि गणेश हाकेंच्या (Ganesh Hake) वक्तव्यावरुन अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. वादग्रस्त वक्तव्यं थांबली नाहीत तर आमच्याही कार्यकर्त्यांना आवरायला अडचणीचं जाईल, असे अजित पवारांनी म्हंटले आहे.
यापुढे महायुतीला तडे जातील असे वादग्रस्त वक्तव्य परत होणार नाहीत याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू करु नये यासाठी एक नियमावली ठरवली जाणार आहे.
या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel), राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare),
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) उपस्थित होते.
या बैठकीत विदर्भासह संपूर्ण राज्याच्या महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सखोल चर्चा झाली असून
अनेक जागांबद्दल तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एकमत झाल्याचीही माहिती मिळत आहे. (Ajit Pawar On Eknath Shinde-Devendra Fadnavis)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद