Ajit Pawar On Mazi Bahin Ladki Yojana | रक्षाबंधनाच्या दिवशी ‘लाडक्या बहिणी’चे 3 हजार रुपये खात्यात जमा होणार; अजित पवारांची माहिती

Ajit Pawar On Mazi Bahin Ladki Yojana

पारनेर : Ajit Pawar On Mazi Bahin Ladki Yojana | महायुती सरकारने (Mahayuti Govt) आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) डोळ्यासमोर ठेऊन ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहे. मात्र, हे पैसे कधी मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान, यासंदर्भात आता स्वत: अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. आज अहमदनगरमधील पक्षाच्या सभेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सभेला संबोधित करताना अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ” या योजनेसाठी कुणाला एक रुपया देणे गरजेचे नाही. ज्यांनी असे पैसे घेतले त्यांना काढून टाकले आहे. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अवश्य भरा. तो फॉर्म भरण्याचे काम शासन करत आहे. प्रशासनातील सहकारी, अंगणवाडीत काम करणाऱ्या माझ्या महिला करतात. तो फॉर्म नीट-नेटका भरा. ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत असतील तरी काळजी करु नका. नवीन योजना आहे, थोड्या अडचणी येऊ शकतात. १ जुलैपासून ही योजना सुरु केली आहे “, असे अजित पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ” तुमच्या अकाऊंटला आम्ही दर महिना १५०० रुपये देणार आहोत. आता सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देणार आहोत. ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल आणि त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात या योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्ही यात लाभार्थी म्हणून बसत असाल तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जातील. त्यामुळे काळजी करु नका, अशी खात्री अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, ज्या गरीब माय माऊली आहेत, त्यांच्या काही गरजा भागवण्यसाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे.
या योजनेवरुन माझ्यावर विरोधकांनी टीका केली.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून आम्ही या योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा विचार केला आहे.
१९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) आहे.
आमच्या माय-माऊलींच्या अकाऊंटला ३ हजार रुपये जुलै- ऑगस्टचे द्यायचे आहेत.
इतकी चांगली योजना असूनही विरोधक माझ्यावर टीका करतात, असे अजित पवार यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

You may have missed