Ajit Pawar On Pink Colour Dress Jacket | पिंक पॉलिटिक्स वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; गुलाबी रंगाच्या जॅकेटबाबत म्हणाले,… (Video)

पुणे : Ajit Pawar On Pink Colour Dress Jacket | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टीने सगळेच पक्ष रणनीती आखत आहेत. बैठका आणि मेळाव्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार गटाने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. (Ajit Pawar On Pink Colour Dress Jacket)
त्याच रणनीतीचा भाग म्हणून पक्षाच्या कार्यक्रमात बॅनर्स, पोस्टर्स आणि जाहिरातींवर अधिकाधिक गुलाबी रंगाचा वापर केला जाणार आहे. हा गुलाबी रंग लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी अजित पवार हेदेखील दैनंदिन जीवनात गुलाबी रंगाचा वापर करणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत अजित पवारांचे पिंक पॉलिटिक्स बघायला मिळणार आहे.
दरम्यान अजित पवार गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसल्याने पत्रकारांनी अजित पवार यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अजित पवारांनी आपल्या जॅकेटवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ” येथे प्रत्येकानेच वेगवेगळे शर्ट घातलेले आहेत. मी कोणते कपडे परिधान करायचे हा माझा अधिकार नाही का?
मी माझे कपडे माझ्या पैशाने घालतो. तुमच्या कोणाच्या पैशाने मी माझे कपडे घेतो का?
जे कपडे सामान्य माणूस घालतो, तेच कपडे मी परिधान करतो. मी काहीतरी वेगळं केलेलं नाही.
माझ्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके
यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत