Ajit Pawar On Pune Flood | पुढील 48 तासांसाठी पर्यटन स्थळ बंद ! अजित पवारांनी घेतला पुण्यातील पूरस्थितीचा आढावा
पुणे : Ajit Pawar On Pune Flood | पुण्यात पावसाचा अक्षरश: हाहाकार माजला आहे. अनेक भागांमध्ये पाणी शिरलं आहे. या पाश्वभूमीवर जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व पर्यटनस्थळे 48 तासांकरीता बंद करण्यात आली आहे. पूर नियंत्रणासाठी भारतीय लष्करी जवान (Indian Army), एनडीआरएफची पथके (NDRF) तैनात करण्यात आली आहेत. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
पवार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात नियंत्रण कक्षात (Pune Police Control Room) जाऊन शहराच्या स्थितीची माहिती घेतली. तसेच पुणे महानगरपालिका येथे अधिकाऱ्यांकडून मदत व बचत कार्याचा आढावा घेतला. नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणी साठ्याची माहिती घेतली व पावसाची स्थिती लक्षात घेऊन विसर्ग करण्याच्या सूचना केल्या.
पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी देण्याचे निर्देश दिले. ४८ तास धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी घालण्याचे आदेश दिले. पर्यटकांनी अशा ठिकाणी जाऊ नये. लवासा येथे दरड कोसळल्याने मदत कार्य सुरू. प्रशासन सतर्क राहून काम करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन पवार यांनी केले.
दुर्घटनेत जखमी झालेल्यांचा खर्च महानगरपालिका व शासनातर्फे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
वेगवेगळ्या भागात एनडीआर एफच्या तुकड्या तैनात आहेत.
आंबील ओढा भागातही खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी