Ajit Pawar On Ravi Rana | अजित पवारांनी रवी राणा यांना सुनावले, कुणीही ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे परत घेऊ शकत नाही

मुंबई : Ajit Pawar On Ravi Rana | आमच्या महायुतीतील काही महाभाग असे वक्तव्य करतात की बघा हां, आम्ही पैसे देणार आहोत, तर मग तुम्ही आम्हाला नाही काही (मत) दिले तर आम्ही (पैसे) परत घेऊ. मी माझ्या माय-माऊलींना सांगतो की, तुमच्या अकाऊंटला गेलेले पैसे परत घेऊ शकत नाही. महायुतीत कोणीही अशा पद्धतीने चुकीचे वक्तव्य करू नये, चुकीला माफी नाही, असे म्हणत अजित पवार यांनी रवी राणा यांना सुनावले आहे. ते एका सभेत बोलत होते. (Ladki Bahin Yojana)
राज्यातील लाभार्थी महिलांना आश्वासित करताना अजित पवार म्हणाले, माय माऊलींनो, कदाचित तुम्हाला कुणी सांगेल की बघा, त्यांना पैसे मिळाले, पण तुम्हाला मिळाले नाहीत. थोडा धीर धरा.
काय म्हणाले होते रवी राणा…
भाजपा समर्थक आमदार रवी राणा म्हणाले होते की, आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजेच 3000 करु, तर आता यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. पण, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून 1500 रुपये वापस घेणार, असे राणा यांनी म्हटले होते.
राणा यांच्या या वक्तव्यावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणा यांचे वक्तव्य धुडकावून लावले होते. फडणवीस यांनी म्हटले होते की, आमचे नेते गमती गमतीत बोलताना काहीही बोलतात,
कुणीतरी म्हणते की, लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेऊ. या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही.
एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि मायाच मिळत असते.
मला विश्वास आहे, बहिणींचा आशिर्वाद आमच्या पाठिशी असेल, असे फडणवीस म्हणाले होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन