Ajit Pawar On Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांच्या विधानपरिषदेच्या चर्चेवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले – “विधानपरिषदेच्या आमदारांबाबत…”

पुणे: Ajit Pawar On Rupali Chakankar | विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. या १२ मध्ये भाजपला ६, शिंदे सेनेला ३, तर अजित पवार गटाला ३ जागा मिळणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान अजित पवार गटाकडून विधानपरिषदेसाठी रुपाली चाकणकर यांचे नाव पुढे आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्याच नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्षेप घेत टीका केली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunit Tatkare) यांनीही माध्यमांसमोर पक्षांतर्गत असलेल्या काही गोष्टींची वाच्यता करत जाऊ नका, असे भाष्य केले होते.
त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ” राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या आमदारांबाबत आम्ही अद्याप कोणत्याही नावांवर शिक्कामोर्तब केलेलं नाही. मात्र तुमच्याच माध्यमातून मला काही नावं वाचायला मिळाली. ही नावं वाचून आमचीही करमणूक झाली,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचंही नाव चर्चेत आल्याने पक्षात धुसपूस निर्माण झाली होती. यावर अजित पवार म्हणाले की, “या नावांबाबतची चुकीची बातमी पसरवली गेली होती. त्यामुळे त्यावरून वाद होण्याचा प्रश्नच नाही आणि त्याबाबत चर्चाही करण्याचं काही कारण नाही.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला आलेल्या तीन जागांवरील नावे निश्चित केल्याची चर्चा होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे आणि सिद्धार्थ कांबळे यांचा समावेश होता.
त्यावरून रुपाली पाटील (Rupali Patil Thombare) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली . ‘एक व्यक्ती एक पद’ या न्यायानुसार आमचे अजित पवार हे न्याय नक्की देतील असा विश्वास आहे.
पक्षाला कळकळीची विनंती की, राष्ट्रवादीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने,
दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत. त्या सक्षम,
काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा, इतर महिलांना समान संधी द्यावी, अ
से म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाकडे विनंती केली होती.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा