Ajit Pawar On Sharad Pawar | ‘साहेबांना सोडणं ही माझी मोठी चूक’, अजित पवारांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

Sharad-Pawar-On-Ajit-Pawar

गडचिरोली: Ajit Pawar On Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून (Maharashtra Assembly Election 2024) हालचाली सुरु झालेल्या आहेत. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होत आपली वेगळी चूल मांडली. महायुती सरकार मध्ये (Mahayuti Govt) त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. (Ajit Pawar On Sharad Pawar)

लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना झाला यात महायुतीला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. आता आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने कंबर कसली आहे. पक्षाकडून जन सन्मान यात्रा सुरु आहे. अजित पवारांचे पिंक पॉलिटिक्स लक्ष वेधून घेत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. त्यात सर्व नेते मंडळी आपली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्व नेते मंडळींकडून राज्याचा दौरा सुरु आहे.

गडचिरोलीचे नेते राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम (Dharmrao Baba Atram) यांची लेक भाग्यश्री आत्राम – हलगेकर (Bhagyashree Atram) लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. यावरून राजकारण तापले आहे.

अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सध्या विदर्भातील गडचिरोलीत आहे.
आणि यादरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना या प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,
‘वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं. तेवढं लेकीवर प्रेम कुणीच करू शकत नाही.
असं असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, हे बरोबर नाही.

समाजाला हे आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. साहेबांना सोडणं ही माझी मोठी चूक होती, मी हे मान्य केली आहे “, असे अजित पवारांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed