Ajit Pawar On Tanaji Sawant | तानाजी सावंतांच्या टीकेला अजित पवारांचे मोजक्या शब्दात प्रत्युत्तर; म्हणाले – ” मला बाकीचं काहीही…”

Ajit Pawar-Tanaji Sawant

पुणे : Ajit Pawar On Tanaji Sawant | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांनी तयारी सुरु केलेली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान महायुतीतील सर्वकाही आलबेल नाही अशी चिन्हे दिसत आहेत.

भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group) सातत्याने राष्ट्रवादी अजित पवार गटावर (Ajit Pawar NCP) निशाणा साधला जात आहे. मागील काही दिवसांपासून अजित पवारांना लक्ष्य केले जात असल्याचे चित्र आहे.

“राष्ट्रवादीबरोबर आपलं कधीही पटलं नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात”, असे विधान शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी केले. त्यानंतर मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री सावंत यांच्या टीकेवर अजित पवार म्हणाले, ” मला बाकीचं काहीही बोलायचं नाही. मला माझ्यापुरतं बोला.
याने असं केलं किंवा त्यांने असं केलं, याबाबत मला काहीही देणंघेणं नाही.
मी सुरुवातीला ठरवलेलं आहे की, कोणावरही टीका करायची नाही. मला कोणी काही बोललं तर माझ्या अंगाला छिद्र पडत नाहीत.

माझं काम सुरु आहे. मी कामाचा माणूस आहे. मी लोकांची कामं करतो.
आज चांगल्या योजना महाराष्ट्रातील जनतेला देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे”,
असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Ajit Pawar On Tanaji Sawant)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed