Ajit Pawar On Trumpet Symbol | “पिपाणीमुळं आमचा राजा वाचला, थोडीफार इज्जत वाचली”, अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले – ‘विरोधकांनी बारामतीत, माढ्यात आमची वाट लावली’

Ajit Pawar-Udayanraje

फलटण: Ajit Pawar On Trumpet Symbol | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) राज्यातील कानाकोपऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सभा होत आहेत. या रणधुमाळीत रविवारी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये (Phaltan Assembly Constituency) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) उमेदवार सचिन कांबळे-पाटील (Sachin Kamble Patil) यांच्या प्रचारार्थ साखरवाडी येथे सभा आयोजित केली होती. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या निकालावर भाष्य केले.

सातारा लोकसभा निवडणुकीवर बोलत असताना पिपाणीमुळे सातारा जागा वाचली, आमचा राजा वाचला, आमचे १३ वे वंशज वाचले, असे भाष्य अजित पवार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार म्हणाले, ” विरोधकांनी कुठनं कुठनं काय कल्पना काढल्या माहिती नाही. झालं आमची वाटच लावली. बारामतीत, माढ्यात आमची वाट लावली. सातारला पिपाणीने वाचवलं. लोकांना तुतारीसारखी पिपाणी दिसली. ३५ ते ४० हजार मतं पिपाणीला गेली. झालं आमचा राजा वाचला, आमचे १३ वे वंशज वाचले. त्यामुळे आमची बाबा, थोडीफार इज्जत वाचली “,असे अजित पवार यांनी म्हंटले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)

You may have missed