Ajit Pawar | राख, वाळू गँगला सुतासारखं सरळ करणार; बीडमध्ये जाऊन अजित पवारांचा इशारा

बीड ः Ajit Pawar | ”राख गँगला सुतासारखं सरळ करणार”, असा इशाराच उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. बुधवारी त्यांनी बीडमध्ये (Beed News) राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्या अडचणी सोडवल्या. त्यानंतर त्यांनी युवा संवाद मेळाव्यास हजेरी लावली.
”बीडमध्ये सगळ्या गँग आहेत, राखेची गँग, वाळूची गँग या सर्व गँग आहेत. येथे सर्व गँग सुतासारख्या सरळ करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले की, बीड ही देवदेवतांची भूमी आहे. जनतेची सेवा करण्यासाठीचे बळ देण्याचे देवदेवतांना साकडे आहे. बीडकरांची बदनामी करणाऱ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत. तसेच, बीडमध्ये मराठा आणि वंजारी यांच्यात अनेकदा वाद दिसून आले आहेत. यावरही अजित पवारांनी भाष्य केले. जाती-जातीतील दुरावा आपल्याला संपवायचा आहे. तसेच, प्रतिमा स्वच्छ ठेवा,” असेही आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले.
दरम्यान, ”शेतीत आता एआय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे. बीडमध्ये तारांगण केले जाणार आहे. विमानतळ जिल्ह्याच्या जवळ असले पाहिजे. टप्प्याटप्याने राज्यातील विमानतळावर नाईट लँडिंग सुरू केले जाईल. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात – अंबाजोगाई येथील सुविधा वाढवण्यात येणार आहेत. पुढे जायचे असेल, तर बेरजेचे राजकारण करत करत सर्वधर्मसमभाव राजकारण केले पाहजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दारूगोळा सांभाळणारा अल्पसंख्याक होता. समाजात एकोपा राहील, असे काम झाले पाहिज,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.