Ajit Pawar To Amit Shah | ‘बिहार पॅटर्न राबवून विधानसभेनंतर मला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा’, अजित पवारांची अमित शहांकडे मागणी; राजकीय वर्तुळात खळबळ

Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnvis-Amit Shah

पुणे : Ajit Pawar To Amit Shah | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) मोर्चेबांधणी केली जात आहे. जागावाटपावरून पक्षात चर्चा सुरु आहेत. इच्छुक उमेदवार ज्या पक्षातून तिकीट मिळेल त्या पक्षाच्या वाटेवर आहेत. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना होणार आहे.

महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात विधानसभा पार पडणार असली तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. मात्र निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतील अशी विधाने भाजप नेत्यांकडून (BJP Leaders) केली जात आहेत.

अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट आपल्याला मुख्यमंत्री करण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे केल्याचं वृत्त समोर आले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा,
अशी मागणी अजित पवारांनी केल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. (Ajit Pawar To Amit Shah)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed