Ajit Pawar To Bhagyashree Atram | वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका – अजित पवार
ऑनलाइन टीम – Ajit Pawar To Bhagyashree Atram | राष्ट्रवादी काँग्रेस ने अहेरी येथे आयोजित जनसन्मान यात्रेत (Jan Sanman Yatra) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्या कन्येला सल्ला दिला की, चूक भूल करू नका, बापासोबत राहा, बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका.
धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री ही परस्पर विरोधी शरद गटाकडून (Sharad Pawar NCP) लढणार असल्याचा दावा केला गेला. या दाव्यामुळे वडिलांविरुद्ध मुलगी मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून सध्या घर फोडण्याचे काम सुरू आहे. मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. ज्या बापाने जन्म दिला तीच मुलगी आता बापाविरोधात गेली आहे. मला त्यांना एकच सांगायचे आहे की, ज्यावेळी वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. अजूनही चूक भूल करू नका, बापासोबत राहा, बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. असे असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे. हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही, त्यासंदर्भात आम्ही देखील अनुभव घेतलेला आहे. मी त्यातून माझी चूक मान्य केली. मात्र आता माझे सांगणे आहे की, वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका. (Maharashtra Assembly Election 2024)
आदिवासी योजनांसाठी 15 हजार 360 कोटी तरतूद
विरोधक योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. योजना सुरू ठेवण्यासाठी आम्हाला आपलं सहकार्य हवं. आम्ही 3 योजना दिल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana), मोफत सिलिंडर आणि गरीब मुलींना 11 वीनंतर मोफत शिक्षण तसेच पावसामुळे मोठं नुकसान झालं 1 रुपयात सरकार विमा देत आहे. आदिवासी योजनांसाठी 15 हजार 360 कोटी अर्थसंकल्पात आपण तरतूद केली आहे. काही जण सांगतात संविधान बदलणार. मागे लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार झाला. जगातला सर्वात एक नंबर संविधान आहे, असे अजित पवार म्हणाले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी