Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का, माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!

sharad-pawar-ajit-pawar

पुणे : Ajit Pawar Vs Sharad Pawar | लोकसभा निवडणुकीत मतदारांचा कल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे (Sharad Pawar NCP) असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अजित पवार यांच्या गटातील (Ajit Pawar NCP) काही नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये चलबिचल सुरू झाली आहे. सत्तेकडे वाहणारे वारे आता विधासभा निवडणूक जवळ आल्याने विरूद्ध दिशेने वाहू लागले आहेत. कारण, अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जात असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) त्यांना लवकरच मोठा धक्का बसणार आहे. येथील एका माजी महापौरांसह १५ ते २० नगरसेवक २० जुलैच्या मुहूर्तावर तुतारी (Tutari) वाजवणार आहेत. (Ajit Pawar Vs Sharad Pawar)

पिंपरी चिंचवडमधील १५ ते २० नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे (Azam Pansare) यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे.

या भेटीत आझम पानसरे यांची पवारांसोबत शहरातील राजकीय स्थितीबाबत चर्चा झाली.
तसेच २० जुलै रोजी शरद पवार यांच्या पिंपरी चिंचवड येथील मेळाव्याच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली.
या मेळाव्यातच १६ माजी नगरसेवकांसह आझम पानसरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती आहे. हा आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांपूर्वी अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Leopard Dive Ghat Pune | पुणे : दिवे घाटात भररस्त्यात प्रवाशांना बिबट्याचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल (Video)

Ravet Pune Crime News | पिंपरी: जागेच्या व्यवहारात महिलेची फसवणूक, डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल