Ajit Pawar Vs Sharad Pawar NCP | अजित पवार गटाला मोठा धक्का! प्रवीण माने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार; तालुक्यातील राजकीय गणिते बदलली जाण्याची चर्चा
इंदापूर : Ajit Pawar Vs Sharad Pawar NCP | इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (Indapur NCP) अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने (Pravin Mane Indapur) हे अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार आहेत. शनिवारी (दि.३) राष्ट्रवादी शरद पवार गटात ते प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी काळात इंदापूरमधील राजकीय गणिते बदलली जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
प्रवीण माने यांचे इंदापूर तालुक्यातील राजकारणात व समाजकारणात ते अग्रेसर आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती पद मिळाल्यानंतर त्यांनी तालुक्यात भरीव निधी देऊन अनेक विकासात्मक कामे केली आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार गटात राहण्यात धन्यता मानली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ खेडोपाडी जाऊन प्रचार केला होता. (Ajit Pawar Vs Sharad Pawar NCP)
परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी माने यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
त्यानंतर माने यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या पक्षाचा उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांच्यासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
माने यांच्या या अकल्पित निर्णयानंतर त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर केला गेला असल्याची चर्चा होती. (Maharashtra Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा