Ajit Pawar Vs Sharad Pawar | अजित पवारांचं टेन्शन वाढलं? आमदार विलास लांडे शरद पवारांच्या संपर्कात? जवळचा मित्र म्हणाला,’आम्ही दोघांनी…’

पिंपरी : Ajit Pawar Vs Sharad Pawar | चिंचवड (Chinchwad Assembly) आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात (Bhosari Assembly) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात (Ajit Pawar NCP) सध्या तणावाचं वातावरण असल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाच्या अनेक नगरसेवक, पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) संपर्कात असल्याचा दावा केला जात आहेत. काही नगरसेवकांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे शरद पवार हे अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात भगदाड पाडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. अशातच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) हे दखील शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर विलास लांडे यांचे मित्र आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भोसरीचे आमदार आणि तुमचे मित्र विलास लांडे हे त्यांच्या समर्थकांसह शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांना भेटले आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी या भागातील काही नगरसेवक शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. अनेक पदाधिकारी शरद पवार गटात जाण्यास उत्सुक आहेत. अशा स्थितीत शरद पवार गटातील कोणाकडून तुम्हाला संपर्क साधण्यात आला आहे का? किंवा आमदार विलास लांडे यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं आहे का? यावर बोलताना अण्णा बनसोडे म्हणाले, विलास लांडे माझे चांगले सहकारी आहेत. आम्ही दोघांनी गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेचे सदस्य म्हणून एकत्र काम केलं आहे. आमचा रोज संपर्क होतो. मात्र, त्यांच्यासोबत अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
विलास लांडे शरद पवार यांच्या गटात जातील का? या प्रश्नाला उत्तर देताना बनसोडे म्हणाले, काल-परवा मी वृत्तवाहिन्यांवर आणि वृत्तपत्रामध्ये अशा आशयाच्या बातम्या पाहिल्या. विलास लांडे आणि आमच्या पक्षातील काही नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली. मात्र, माझ्या माहितीनुसार शरद पवारांना भेटल्यानंतर विलास लांडे यांनी अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. अजित पवारांशी केलेल्या चर्चेनंतर विलास लांडे अजित पवार गटात थांबल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Raigad ACB Trap | बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी वित्त अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीकडून अटक
Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का,
माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!
Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी दिघीतील व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा,
सायबर पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या (Video)