Ajit Pawar Vs Sharad Pawar | पक्ष सोडून शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याला अजित पवारांचा इशारा, नंतर स्पष्टीकरणही दिलं, म्हणाले – “दम नाही बाबा आमचा नमस्कार आहे”

पुणे: Ajit Pawar Vs Sharad Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक स्वभावाने ओळखले जातात मात्र महायुतीत गेल्यापासून ते थोडेफार मवाळ झाल्याचे पाहायला मिळतात. जनसन्मान रॅलीच्या (Jan Sanman Yatra) भाषणादरम्यान याचा प्रत्यय आला आहे. सभेतील शेतकऱ्याकडून दुधाचे अनुदान न मिळाल्याची तक्रार येताच अजित पवार यांनी सोनाई दूधसंघाला (Sonai Dudh Sangha) इशारा दिला आहे. मात्र त्यानंतर त्यांना स्पष्टीकरणही द्यावे लागले.
अजित पवार म्हणाले, “मला आत्ता चिठ्ठी आली की जानेवारीपासून दुधाचे अनुदान मिळालेले नाही. मला त्याबाबात सविस्तर माहिती द्या. तिथं जे अधिकारी होते त्यांची मधल्या काळात बदली झाली असून तिथे नवीन अधिकारी आले आहेत. आम्ही जे अनुदान जाहीर केलंय ते द्यायचं कोणाचंही ठेवणार नाही,” असा शब्द अजित पवार यांनी दूध उत्पादकांना दिला.
यावेळी गर्दीतून एका शेतकऱ्याने सोनाई दूधसंघाची तक्रार केली. त्यावर अजित पवार म्हणाले, “सोनाईकडे पण बघतो ना, कसं त्यांनी दिलं नाही ते. म्हणजे पैसे का दिले नाहीत ते बघतो. नाहीतर तुम्ही म्हणाल दादा तर दमच द्यायला लागला. दम नाही बाबा आमचा नमस्कार आहे”,असं म्हणत अजित पवारांनी हात जोडले आणि उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, सोनाई दूधसंघाचे प्रमुख असलेले यशवंत माने (Yashwant Mane Sonai) आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण माने (Pravin Mane Sonai) यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांना पाठिंबा दिला होता.
मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेत त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तसेच प्रवीण माने हे इंदापूरमधून (Indapur Assembly) तुतारी (Tutari) चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवण्यासही इच्छुक आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार? विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग