Akshay Shinde Encounter Case | ‘आता आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका’, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाने सीआयडीला पुन्हा फटकारलं
मुंबई : Akshay Shinde Encounter Case | बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Assault Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास रोडवर (Mumbra Bypass Road) पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला. अक्षयने पोलिस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय जागीच ठार झाला. या एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अक्षयच्या पालकांनी उच्च न्यायालयात केली होती. (Mumbai High Court)
त्याबाबत न्या. रेवती मोहिते-डेरे (Revati Mohite Dere) आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण (Justice Prithviraj Chavan) यांच्या खंडपीठासमोर (दि.२) सुनावणी घेण्यात आली. याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते, मात्र अद्याप संबंधित कागदपत्रे देण्यात आलेली नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत सीआयडीला (Criminal Investigation Department Maharashtra State) फटकारले आहे तसेच संबंधित कागदपत्रे सुपूर्द करण्यास सांगितले आहे. (Badlapur School Case)
तुमच्या कार्यपद्धतीमुळेच तुमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तुम्ही नेमका काय तपास केला? तुम्हाला वारंवार मुदत देऊनही वैद्यकीय कागदपत्रे का गोळा केली नाही? तुम्ही जाणीवपूर्वक त्यास विलंब करीत आहात का? आता आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, अशा शब्दात खंडपीठाने सीआयडीची कानउघाडणी केली. (Mumbai High Court On Maharashtra CID)
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सीआयडीकडून तपासात प्रचंड हयगय केली जात आहे. ही घटना अत्यंत संवेदनशील असताना तपासातील दिरंगाई अक्षम्य आहे. आतापर्यंत अनेकदा मुदत देऊनही अद्याप कागदपत्रे सादर का केली नाही? असा सवाल उपस्थित करीत उच्च न्यायालयाने सीआयडीला धारेवर धरले. तसेच चौकशीसाठी २० जानेवारीपर्यंतची मुदत देत तपास अहवाल सरकारला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (Akshay Shinde Encounter Case)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी