Alandi Pune Crime News | 12 वर्षाच्या मुलावर शिक्षकाचा अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाला अटक, आळंदीतील घटना
पुणे : Alandi Pune Crime News | आळंदी येथे शिक्षणासाठी वसतीगृहात राहणार्या एका १२ वर्षाच्या मुलावर तेथील शिक्षकाने अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Torture) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आळंदी पोलिसांनी (Alandi Police Station) व्यंकटेश काशिनाथ माडनूर (Venkatesh Kashinath Madnoor) या शिक्षकाला अटक केली आहे. हा प्रकार आळंदी येथील एका संस्थेत शनिवारी पहाटे पाच वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील संस्थेत मुलांना आध्यामिक शिक्षणासाठी ठेवले जाते. तेथे व्यंकटेश हा शिक्षक म्हणून काम करतात. त्याने शनिवारी पहाटे पाच वाजता एका १२ वर्षाच्या मुलाला झोपेतून उठविले. त्याला टी व्ही रुममध्ये घेऊन गेला. त्याच्या जवळील मोबाईल मुलाकडे गेम खेळण्यासाठी दिला. त्याची चढ्ढी काढली. त्याला पालथे पोटावर झोपवून अनैसर्गिक कृत्य केले. मुलगा नको नको म्हणत असताना तो फिर्यादीला म्हणाले की गप्प बस काय नाही होत़ चांगल असतच. त्यानंतर त्याला मुलांना उठवायला जा असे सांगितले. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर आळंदी पोलिसांनी या मुलाची फिर्याद घेऊन शिक्षकाला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक साळी तपास करीत आहेत. (Alandi Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य