All Kondhwa Social Foundation | नाजमीन वजीद शेख यांची हज यात्रेसाठी निवड ! 7 जणांची उमराह यात्रेसाठी निवड, ऑल कोंढवा सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘हमारे नबी, हमारी पहेचान’ स्पर्धेचे आयोजन
पुणे : All Kondhwa Social Foundation | ऑल कोंढवा सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘हमारे नबी, हमारी पहेचान’या क्विझ कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हज यात्रा आणि उमराह यात्रेसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात हज यात्रेसाठी नाजमीन वाजिद शेख यांची निवड करण्यात आली. उमराह यात्रेसाठी अलिया अस्लम सय्यद, अलिझा रशीद खान, मशमुम तौसिफ सय्यद, अरहान अशपाक शेख, अबुबकर इरफान नदाफ यांची निवड झाली तर, अरहाना कादीर मन्सुरी यांची ऑनलाईन अर्जातून उमराह यात्रेसाठी निवड करण्यात आली आहे.
कोंढव्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन ऑल कोंढवा सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी फिरोज शेख माजी नगरसेवक रईस सुंडके आणि माजी नगरसेविका परविन हाजी फिरोज यांनी केले होते.
या क्विझ स्पर्धेसाठी २२ हजार २०० फार्म भरुन आले. त्यापैकी अचूक उत्तरे दिलेल्या ८ हजार ३५ जणांचे फार्म वैध ठरले. त्यातून उमरासाठी ६ मुला मुलींची व एका महिलेची लकी ड्रॉद्वारे निवड करण्यात आली. ९ हजार जणांनी ऑनलाईन अर्ज पाठविले. त्यातील २ हजार ७०० जणांनी अचूक उत्तरे दिली. त्यातून एकाची निवड करण्यात आली आहे.

यावेळी आमदार चेतन तुपे म्हणाले की, हा खूप पवित्र कार्यक्रम आहे. अशा प्रकारे स्पर्धांचे केवळ कोंढव्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आयोजन केले पाहिजे.
हाजी फिरोज म्हणाले हा आमचा कोंढवा सर्व जाती धर्माचे लोक राहत आहेत . सर्वात जास्त लोक संख्या कोंढव्यात शाळा,शिक्षण, हॉस्पीटल , कोंढव्यात आहे. रईस सुंडके चौदा महिन्याचे नगरसेवक होते त्यांचे कार्यामुळे तीन नगरसेवक निवडून आले पाच पंचवीस वर्षचे काम पाच वर्षात पूर्ण होत नाही .
रईस सुंडके म्हणाले कोंढव्याला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे .तसे होऊ देणार नाही .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मौलाना रशीद मिफ्ताही यांनी केले .
यावेळी अन्वर अत्तारी साहेब फैजाने मदिना व्हॅली स्कुलच्या सुनिता कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन स्कुलच्या तब्बसुम शेख, निवू इंग्लिश ग्रेस स्कूलचे प्रिसिपल झकी शेख,मौलाना रशिद मिफाही, मौलाना असरार, कारी इद्रिस, अनिस सुंडके, हसिना इनामदार, झाहिद शेख, नावेद शेख, प्रो. शफी पठाण, समीर पठाण, बासित शेख, डॉ.अब्दुल माजीद भट, सोएब शेख, रोटी फाऊंडेशनचे रशिद शेख, मुक्तार शेख, जबीर शेख,अन्वर मेमन आदी मान्यवर उपस्थित होते. हाजी बासित यांनी आभार व्यक्त केले
