Aman Tambe Punekar | ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

Aman Tambe Punekar | Senior folk drama artist Aman Tambe Punekar passed away due to a minor illness

Aman Tambe Punekar |  ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर ( वय ६६) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

पुण्यातील आर्यभूषण थिएटरचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अमन तांबे पुणेकर सह सरस्वतीबाई कोल्हापूरकर या नावाने त्यांचा तमाशा फड होता. पाच तोफांची सलामी, आईचं काळीज, दख्खांचा मराठा ही  त्यांची गाजलेली वगनाट्ये आहेत. संताजी घोरपडे वगनाट्यातील औरंगजेबाची भूमिका खूपच प्रसिद्ध झाली होती. त्यांनी विविध चित्रपटात व टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. उत्तम प्रकारचे गायक व सोंगाड्या म्हणून ते नावारूपास आले होते. गेली 50 वर्ष त्यांनी लोककलेच्या माध्यमातून रसिकांची सेवा केली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, शाहीर पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान यासारखे अनेक संस्थांनी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले होते.

भवानी पेठ येथील कब्रस्तान मध्ये त्यांच्या पार्थिवाचे दफनविधी केले. त्यांचे चिरंजीव व लोकनाट्य कलावंत राहिल तांबे यांनी अंतिम संस्कार केले. यावेळी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह राजकीय व लोककला क्षेत्रातील अनेक कलावंत उपस्थित होते.

You may have missed