Ambegaon Pune Crime News | पुणे : मध्यरात्री परिसरात ड्रोन कॅमेरा फिरला अन् मंदिरातील दानपेटी फोडली, आंबेगाव तालुक्यातील घटना
आंबेगाव/पुणे : Ambegaon Pune Crime News | पुणे ग्रामीण (Pune Rural Police) भागात रात्रीच्यावेळी आकाशात फिरणाऱ्या ड्रोनची दहशत पसरली आहे. मागील काही दिवसात ड्रोन ज्या परिसरात फिरले त्याच परिसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथील काळूबाई मंदिरातून देवीच्या अंगावरील दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना गुरुवारी (दि.11) सकाळी उघडकीस आली आहे. ही घटना ताजी असतानाच शिंगवे गावातील ग्रामदैवत श्री भारवनाथ माता जोगेश्वरी मंदिरात चोरी झाली आहे (Bhairavnath Temple). चोरी होण्यापूर्वी परिसरात मध्यरात्री ड्रोनने घिरट्या घातल्या होत्या. ( Ambegaon Pune Crime News )
चोरट्यांनी शिंगवे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील अंदाजे 40 ते 50 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. ही घटना शुक्रवार (दि.12) मध्यरात्री घडली. या परिसरात ड्रोन फिरल्यानंतर चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चोरट्यांनी मंदिराची खिडकीच्या बाहेरील स्टीलचे ग्रील तोडले. त्यानंतर खिडकीची काच फोडून मंदिरात प्रवेश केला. दानपेटीचे कुलूप तोडून त्यामधील रक्कम चोरट्यांनी लंपास केली. दानपेटीत अंदाजे 40 ते 50 हजार रुपये असल्याचे पुजारी रामचंद्र गुरव यांनी सांगितले.
पुजारी रामचंद्र गुरव आज (शनिवार) पहाटे पाच वाजता मंदिरात पुजेसाठी आले. त्यावेळी त्यांना मंदिराची पूर्वेकडील खिडकी उघडी दिसली. त्यांना शंका आल्याने त्यांनी दानपेटी पाहिली तर कुलूप दिसले नाही. चोरीची घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे
यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली.
मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने त्यांनी गावातील ग्रामपंचायतीच्या विविध ठिकाणी
बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पाहिले. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड