Ambegaon Pune Crime News | पुणे: चुहा गँगकडून मेफेड्रॉन, पिस्टलसह 13 लाख 71 हजारांचा माल हस्तगत

Ambegaon Police Station

पुणे : Ambegaon Pune Crime News | मोक्का प्रकरणात (MCOCA Act) न्यायालयाने २ वर्ष तडीपार केले असतानाही चुहा ऊर्फ तौसिफ हा शहरात आला़ साथीदारांच्या मदतीने दरोड्याची तयारी करत असताना आंबेगाव पोलिसांनी (Ambegaon Police) चुहा गँगच्या चौघांना पकडले (Chuha Gang Arrested). त्यांच्याकडून ३ लाखांची पिवळसर रंगाची पावडर स्वरुपातील मेफेड्रॉन, ४० हजार ५०० रुपयांचे पिस्टल, एक जिवंत काडतुस, मेफेड्रॉन विक्रीतून मिळविलेले ४ लाख ८० हजार रुपये, कोयता, दोन दुचाकी, एक कार असा १३ लाख ७१ हजार १२० रुपयांचा माल जप्त केला आहे. (Pistol Seized)

तौसिफ जमीर सय्यद ऊर्फ चुहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. रुपचंद तालीमसमोर, मंगळवार पेठ, ता. करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हिड इसार (वय २९, रा. रघुनंदन अपार्टमेंट, धानोरी), कुणाल कमलेश जाधव (वय २५, रा. प्रसाद रेसिडेन्सी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जनाब (रा. कॅम्प) हा पळून गेला आहे.

याबाबत पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रजमधील संतोषनगर येथी डिलाईट बेकरीसमोर रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला. तौसिफ ऊर्फ चुहा याच्याविरुद्ध जातील दंगली, दरोडा, जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत. त्याला २०२० मध्ये एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होते. तेथून सुटून आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरुच राहिली़ त्याच्यावर एकूण १५ गुन्हे आहेत़ तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta IPS) यांनी त्याच्याविरुद्ध मोक्का कारवाई केली होती. या गुन्ह्यात विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे (Judge V. R. Kachare) यांनी ६ नोव्हेबर २०२३ पासून दोन वर्षाकरीता तडीपार केले होते. असे असतानाही या तडीपारीचा भंग करुन शहरात आला होता. (Pune Police Tadipari Action)

आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने (Sharad Zine PI)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर (PSI Mohan Kalamkar) व त्यांचे सहकारी संतोषनगर (Santosh Nagar Katraj) परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, डिलाईट बेकरीसमोर काही जण हत्यारासह दरोड्याच्या उद्देशाने येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. बातमीप्रमाणे तेथे आलेल्या चौघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून मेफेड्रॉन, पिस्टल, जिवंत काडतुसे, रोख रक्कम, कोयता, दोन दुचाकी, एक कार असा १३ लाख ७१ हजार १२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma IPS), अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (Pravinkumar Patil IPS), पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (Smartana Patil IPS), सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे (Rahul Aware ACP) यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे (API Priyanka Gore), पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, सुरेश शिंदे (PSI Suresh Shinde), पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, अविनाश रेवे, बाबासो पाटील, निलेश ढमढेरे यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Katraj Pune Crime News | कोर्टाने तडीपार केले असतानाही दरोड्याच्या तयारीत असलेली चुहा गँग जेरबंद ! पिस्टल, काडतुस, मॅफेड्रान, रोकड असा माल हस्तगत

You may have missed