Amit Shah Mumbai Tour | अमित शहांच्या दौऱ्यावेळी अजित पवार अनुपस्थित?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई: Amit Shah Mumbai Tour | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. गणेशोत्सवानिमित्त शहा यांनी वर्षा आणि सागर बंगल्यावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा केली. तसेच लालबागच्या राजाचे दर्शन देखील घेतले.
या काळात यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे (Vinod Tawade), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे नेते लालबागमध्ये (Lalbaug) उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुंबईत असूनही अमित शहा यांच्यासोबतच्या या दौऱ्यावेळी उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महायुतीमधून (Mahayuti) बाहेर पडतील, अशी चर्चा सुरु आहे. शिंदे गटाच्या नेत्यांकडून अजित पवार यांच्याविरोधात टीका केली जात आहे. अजित पवार यांना महायुतीमधून बाहेर पडायला भाग पाडणे, हा शिंदे गटाचा उद्देश असल्याची चर्चा आहे. अशातच आज अजित पवार हे अमित शहा यांच्यासोबत लालबागमध्ये दिसून न आल्याने या सगळ्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा