Amit Shah News | भाजप नेत्यांचा अमित शहांकडे नवा प्रस्ताव; शिवसेना शिंदे गटासह अजित पवारांची डोकेदुखी वाढणार

Amit Shah

मुंबई : Amit Shah News | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान भाजप नेत्यांनी शहांना दिलेल्या प्रस्तावाने शिंदे गटासह (Shivsena Shinde Group) अजित पवार गटाचीही (Ajit Pawar NCP) डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. महायुतीत जागावाटपावरून (Mahayuti Seat Sharing) रस्सीखेच सुरु आहे. मतदारसंघात घटकपक्षाचे एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यातील किमान २५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी मागणी राज्यातील भाजप नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रस्तावाला अमित शहा सहमती देणार का? तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीची याबाबत भूमिका काय राहणार हे पाहणेही महत्वाचे असणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने किमान १५० जागा लढवाव्यात, यासाठी महाराष्ट्र भाजपमधील नेते आग्रही असल्याचे समजते. तर दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीच्या जागावाटपात आपल्या वाट्याला किमान ७० जागा याव्यात, अशी अपेक्षा असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीच्या जागावाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, हे पाहावं लागेल.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर रविवारीच मुंबईत दाखल झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत होते.
पण, अजित पवार न दिसल्याने चर्चा रंगली. शेवटी शहा मुंबईहून रवाना होत असताना अजित पवार विमानतळावर पोहोचले आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) , सुनील तटकरेंसह (Sunil Tatkare) त्यांनी शहांशी चर्चा केली. (Amit Shah News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed