Amit Shah On Maharashtra Tour | महायुतीत मोठ्या घडामोडी होण्याचे संकेत; अमित शहांचा पुन्हा महाराष्ट्र दौरा

Ajit-Pawar-Eknath-Shinde-Devendra-Fadnvis-Amit-Shah

मुंबई: Amit Shah On Maharashtra Tour | लोकसभेत राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्यानंतर आता भाजपने आगामी विधानसभेला कंबर कसली आहे. दरम्यान विधानसभेची (Maharashtra Assembly Election 2024) रणनीती ठरवण्यासाठी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचे महाधिवेशन पार पडले. यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात तसेच आता भाजपबरोबर या निवडणुकीत मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) असणार आहे.

https://www.instagram.com/p/DAICZv6Cbwe/?img_index=1

लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा तिढा लवकर सुटला नाही. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी वेळच मिळाला नाही. परिणामी अनेक जागांवर पराभव पत्कारावा लागला, असं महायुतीतील प्रमुख नेत्यांचं म्हणणं आहे. आगामी विधानसभेत मात्र ही चूक आपण टाळायला हवी, यावर देखील तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे.

https://www.instagram.com/p/DAGuidWC7D2

परराज्यातील अनेक नेते महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहात आहे याचा आढावा ते घेत आहेत. त्यावरून जागावाटप, उमेदवार निवडला जाणार आहे. या सर्व घडामोडीवर अमित शहा लक्ष देऊन आहेत. दरम्यान राज्यात त्यांचेही दौरे वाढलेले आहेत. दरम्यान आता पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे महायुतीत मोठ्या घडामोडी घडणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

https://www.instagram.com/p/DAGod-kimk7

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २४ आणि २५ सप्टेंबर रोजी अमित शहा महाराष्ट्रात येणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात ते मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत देखील अमित शहांची बैठक होणार आहे.

https://www.instagram.com/p/DAGmGj2CHED

येत्या २४ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे महायुतीची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच बैठकीत जागावाटपाला अंतिम रुप दिले जाईल. दरम्यान, जागावाटपाचा फॉर्म्यूला पितृपक्षात जाहीर करायचा की नवरात्रात (Navratri) हे देखील याच बैठकीत ठरणार असल्याची माहिती आहे.

https://www.instagram.com/p/DAIVYxOtGGa

दुसरीकडे २३ सप्टेंबर रोजी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देखील होणार आहे.
या बैठकीत भाजपची ६० ते ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते.
आगामी विधानसभेत भाजप १५० ते १६० जागा लढवण्यास इच्छुक असून शिवसेना शिंदे
आणि अजित पवार गटाला समसमान जागा मिळू शकतात, अशी माहिती राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे.

https://www.instagram.com/p/DAIXSdUpKXn

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime Branch News | सराईत वाहनचोराकडून ६ मोटारसायकली हस्तगत ! भोसरी, चाकण, चिंचवड, शिर्डी, सोलापूर येथे केल्या होत्या चोर्‍या (Video)

Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!

MCOCA Action On Enjoy Group | जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या एन्जॉय ग्रुपवर मोक्का कारवाई (Video)

You may have missed