Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’, अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’
कोल्हापूर : Amit Shah On Sharad Pawar | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्रात दौरे करत आहेत. लोकसभेला अपेक्षित यश न मिळाल्याने आता विधानसभेला राज्य हातातून जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपचे नेते, केंद्रीय अमित शहा यांचे महाराष्ट्र दौरे वाढलेले आहेत. दरम्यान एका सभेत बोलताना अमित शहांनी ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’, असे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
https://www.instagram.com/p/DAXrMhDJ28P
“शरद पवार आणि त्यांच्या घटक पक्षांचे बूथ पातळीवरील कार्यकर्ते फोडा. त्यांना आपल्या पक्षात घ्या. त्यांचा बूथ रिकामा झाला की त्यांची ताकद संपणार आहे. त्यामुळे पवार आणि त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा”, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा महासैनिक दरबार हॉलमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते.
https://www.instagram.com/p/DAXjsR2zQli
ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून तुम्ही नाराज आहात. काँग्रेसला तीन निवडणुकीत मिळून जेवढ्या जागा मिळाल्या नाहीत, तेवढ्या आपल्याला केवळ २०२४ च्या निवडणुकीत मिळाल्या आहेत. देशातील आपल्या मतांचा टक्का वाढला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) कशाचा अहंकार बाळगत आहेत? भाजप असा पक्ष आहे, ज्याने अनेक जय-पराजय पाहिले आहेत. आम्ही २ खासदारांवरून ३०० पर्यंतचा टप्पा गाठला आहे.”
https://www.instagram.com/p/DAXp0KaiYFD
ते पुढे म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत या देशात जे कधीच घडणार नाही, असे वाटत होते ते आपण करून दाखवले आहे. नक्षलवाद संपवला. दहशतवाद गाडला. नागरिकत्व सुधारणा कायदा केला. तिहेरी तलाक संपवला. देशाची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकावर नेली. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले. अयोध्येत राम मंदिर बांधले. भाजप कार्यकर्ते मंत्री होण्यासाठी काम करत नाहीत, तर देशाला परम वैभवाला नेण्यासाठी काम करतात”, असे शहा यांनी सांगितले.
https://www.instagram.com/p/DAXn2EnJlCI
पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी मेळाव्याला केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Davne), राष्ट्रीय सरचिटणीस शिवकुमार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांची प्रमुख उपस्थिती होती. (Amit Shah On Sharad Pawar)
https://www.instagram.com/p/DAWIGC6C0UN/?img_index=1
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”