Amit Shah On Sharad Pawar | अमित शहांची शरद पवारांवर बोचरी टीका; म्हणाले – ‘भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके त्यांनी …’

Amit Shah-Sharad Pawar

पुणे : Amit Shah On Sharad Pawar | लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे धक्का बसलेल्या भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचं महाअधिवेशन पुण्यात होत आहे (BJP Executive Meeting In Pune) . यामध्ये उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके असल्याची टीका शहा यांनी केली आहे.

अमित शहा म्हणाले, ” भारतातील राजकारणात भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं आहे अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केली.

“एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा राज्यात भाजपाची सत्ता आली तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे, जेव्हा शरद पवार यांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जाते. २०१४ ला भाजपा सत्तेत आली मराठा आरक्षण (Maratha Reservation) आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले मराठा आरक्षण गेलं तेव्हा तुम्ही ठरवा काय करायचं ते”, असं अमित शहा यावेळी म्हणाले.

काँग्रेस काळात, शरद पवार केंद्रात मंत्री असताना महाराष्ट्रावर कसा अन्याय झाला याचा पाढा शहा यांनी वाचला.
२०१४ ते २०१९ हा कार्यकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात विकासासाठी सर्वात जास्त लक्षात राहिल
असं सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची स्तुती केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Attack On Digital Content Creator Lady | पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणारा अटकेत

BJP Executive Meeting In Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन सुरु

Manorama Khedkar | पोलीस कोठडीत देखील पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरचा रुबाब कमी होईना! जेवण बेचव असल्याची तक्रार

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत भाजपच ‘दादा’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागात गुंडाळणार?

You may have missed