Amit Shah On Sharad Pawar-Uddhav Thackeray | अमित शहांचा पवारांसह ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले – ‘विधानसभेच्या निकालाने शरद पवारांना धडा शिकवला तर ठाकरेंच्या विश्वासघाताच्या राजकारणाचा बदला घेतला’

Amit Shah

अहिल्यानगर : Amit Shah On Sharad Pawar-Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर आज (दि.१२) शिर्डी येथे भाजप प्रदेश कार्यकारणी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात संवाद साधताना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “भाजपाच्या विजयाने विरोधकांचे सत्तेत येण्याचे स्वप्न भंगले. या विजयाने शरद पवारांना धडा शिकवला आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या विश्वासघाताच्या राजकारणाचा बदला घेतला आहे”, अशी बोचरी टीका शहा यांनी केली आहे.

अमित शहा म्हणाले, ” एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी आहे, हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवले आहे. फसवणूक आणि विश्वासघाताचे राजकारण सुरू करणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सामावून न घेण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. शरद पवारांनी दगा-फटक्याचे राजकारण केले आहे. त्यांच्या राजकारणाला गाडण्याचे काम तुम्ही केले आहे. मोदीजींच्या विकासाचे राजकारण आणि सनातन संस्कृतीचा तेजस्वी प्रवाह पुढे नेण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा केले आहे.”

ते पुढे म्हणाले, ” देशात केवळ तत्त्वांचे राजकारण चालेल, असा निर्धार महाराष्ट्रातील जनतेने केला आहे. घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर देत घराणेशाही नाकारली आहे. महाराष्ट्राच्या विजयाने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासघाताचे राजकारण २० फूट जमिनीखाली गाडले आहे. (BJP state convention in Shirdi)

लबाडीने आणि कपटाने मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या जागी आणले आहे.
पंचायतीपासून संसदेपर्यंत महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयाचे शिल्पकार बनण्याचे काम केले आहे.
भविष्यात कोणीही दगा देऊ शकणार नाही, एवढा मजबूत भाजप उभा करण्याचे काम केले आहे”,
असे अमित शहा यांनी म्हंटले आहे. (Amit Shah On Sharad Pawar-Uddhav Thackeray)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed