Amit Shah On Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते’; अमित शहांचा पुण्यात घणाघात; म्हणाले – ‘कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या…’

Amit Shah-Uddhav Thackeray

पुणे : Amit Shah On Uddhav Thackeray | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) फटका बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) रणनीती ठरवण्यासाठी पुण्यात भाजपचे महाअधिवेशन सुरु आहे (BJP Executive Meeting In Pune). या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित आहेत. यावेळी अधिवेशना दरम्यान संबोधित करताना त्यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) जहरी टीका केल्याचे पाहायला मिळाले. तसेच पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरेंवरही त्यांनी निशाणा साधला आहे.

अमित शहा म्हणाले, ” कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले आहेत, याकुब मेननला सोडण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर ठाकरे बसले आहेत, झाकिर नाईक (Zakir Naik) यांना शांतता दूत बनवणाऱ्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले आहेत, पीएफआय (PFI) या संघटनेला पाठिंबा देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत, संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांना पण हे साथ देत आहेत, यांना लाज वाटली पाहिजे. राज्यात ‘ औरंगजेब फॅन क्लब ‘ म्हणजे कोण तर ते म्हणजे महाविकास आघाडी. आणि या औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत उद्धव ठाकरे,” अशी बोचरी टीका अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशात राष्ट्रीय नेत्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawade), भाजपचे महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw), भुपेंद्र यादव (Bhupender Yadav), पीयूष गोयल (Piyush Goyal), आशिष शेलार (Ashish Shelar), पंकजा मुंडे (Pankaja Munde), मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) उपस्थित आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Attack On Digital Content Creator Lady | पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणारा अटकेत

BJP Executive Meeting In Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन सुरु

Manorama Khedkar | पोलीस कोठडीत देखील पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरचा रुबाब कमी होईना! जेवण बेचव असल्याची तक्रार

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत भाजपच ‘दादा’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागात गुंडाळणार?

You may have missed