Amol Balwadkar | ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसळे यांच्या उपस्थितीत अमोल बालवडकर फाउंडेशनचे ‘कामाचा माणूस’ गाणे लॉन्च
पुणे : Amol Balwadkar | बालेवाडी हायस्ट्रीट ग्राऊंड (Balewadi High Street Ground) येथे अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे (Amol Balwadkar Foundation) आयोजित दहीहंडी उत्सव (Dahi Handi 2024) मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. अमोल बालवडकर फाउंडेशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे नेहमीच आकर्षण असते. त्यामुळे तरुणाईची या उत्सवाला मोठी गर्दी असते. यंदाच्या दहीहंडीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसून आली.
दरम्यान यावेळी ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) यांच्या उपस्थितीत अमोल बालवडकर फाउंडेशनचे ‘कामाचा माणूस’ हे गाणे (Kamacha Manus Song) लॉन्च करण्यात आले. या गाण्याला पावनखिंड चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक देवदत्त बाजी यांनी संगीतबद्ध केले असून रवींद्र खोमणे यांनी आपल्या सुरेल आवाजात सदरील गाणे गायले आहे. यांसह अमोल बालवडकर फाउंडेशनच्या सदस्यांनी यासाठी आपले बहुमूल्य योगदान दिले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा