Amol Balwadkar Foundation | लाडक्या बहिणींची अमोल बालवडकर यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी झुंबड; हजारो महिलांनी घेतली भावी आमदारांबरोबर सेल्फी (Video)
पुणे : Amol Balwadkar Foundation | श्रावण महिना हा व्रतवैकल्पाचा महिना. अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने या मंगल मासात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यातील प्रत्येक कार्यक्रमात लाडक्या बहिणींनी अमोल बालवडकर यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. श्रावणातील मंगळागौरी, रक्षाबंधन असे कार्यक्रम अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने कोथरुड विधानसभा मतदारसंघात (Kothrud Assembly Constituency) ठिकठिकाणी आयोजित केले होते.
https://www.instagram.com/reel/C_Z7rnCpZRo/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
अतिशय रंगतदार झालेल्या या कार्यक्रमांनंतर महिला स्वत: पुढे होऊन अमोल बालवडकर यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी करताना दिसत होते. काही वेळा तर महिलांची इतकी झुंबड उडत होती की महिलांना सावरणे अवघड होत होते. दिवसभर वेगवेगळ्या कामात स्वत:ला वाहून घेतलेले अमोल बालवडकर हे मात्र कितीही उशीर झाला तरी महिलांना हसतमुखाने सेल्फी घेण्यास मदत करत होते. महिलांच्या हातातून मोबाईल घेऊन त्यांच्याबरोबर सेल्फी घेऊन देत होते.
कोथरुड विधानसभा मतदारसंघात ‘कामाचा माणूस’ म्हणून (Kamacha Manus) अमोल बालवडकर यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे असंख्य नागरिक त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सकाळपासून त्यांच्या कार्यालयात गर्दी करीत असतात. अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने लाडकी बहिण योजनेचे (Ladki Bahin Yojana) फॉर्म घरोघरी जाऊन भरुन घेण्यात आले. त्यामुळे अमोल बालवडकर हे हजारो घरात जाऊन पोहचले. अमोल बालवडकर गेली 10 वर्षे करीत असलेल्या सामाजिक कार्याचे फळ आता मिळताना दिसून येत आहे. त्यातून अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ते करत असलेल्या कार्याला लोकांनी एकप्रकारची पसंती दिलेली अशा कार्यक्रमांमधून दिसून येत आहे. (Amol Balwadkar Foundation)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक