Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या
कोथरूड : Amol Balwadkar Foundation | हास्यांचे फवारे,उखाणे, संगीताचा सूर, गाण्यांनी धरलेला ठेका आणि मनोरंजनाचे खेळ अशा वातावरणात कोथरूडकर वहिनींसाठी पैठणीचा खेळ जोरदार रंगला. ”मंगळागौर” कार्यक्रमाने तर माय माऊलींना माहेरी आल्याचा भास झाला आणि वातावरण गहिवरले. अशा भारलेल्या वातावरणात लकी ड्रॉ मध्ये महिलांनी पैठणी सोबत भरघोस बक्षीसांच्या मानकरी ठरल्या.
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या आयोजित खेळ रंगला पैठणीचा तसेच महिलांचा मेळावा कोथरूड पंडित फार्म, कर्वेनगर येथे ( दि. 17) आयोजित करण्यात आला होता. यासोबतच महिलांसाठी मनोरंजन म्हणून मंगळागौर आणि लकी ड्रॉ चे देखील आयोजन करण्यात आले होते. कोथरूड परिसरातील भगिनींनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग नोंदवून मनसोक्तपणे आनंद लुटला. “सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिका फेम माधवी निमकर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सादरीकरण अँकर आर. जे. अक्षय यांनी केले.
या कार्यक्रमात अडीच हजार पेक्षा जास्त महिलांनी सहभाग दर्शविला. लाडक्या बहीण योजनेतील सहभागी महिला, तसेच कोथरूड परिसरातील अनेक महिलांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.
लकी ड्रॉ मध्ये महिलांनी पटकावली बक्षीसे
खेळामध्ये जिंकलेल्या महिलांसाठी भरघोस बक्षीसांची रेलचेल पाहायला मिळाली.
लकी ड्रॉ मध्ये सुलभा गजानन धुमाळ यांना वॉशिंग मशिन,
अपूर्वा नितीन तापकीर यांना मिक्सर, पुष्पा अशोक पवार यांना फ्रिज,
सारिका तावरे यांना टिव्ही आणि शुभांगी पेडणेकर यांना टू व्हीलर मिळाली.
दरम्यान लकी ड्रॉ स्पर्धेत बक्षिसे जिंकल्याबद्दल या सर्व भगिनींनी विशेष आनंद व्यक्त करून आभार मानले.
तसेच सहभागी महिलांना देखील आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना क्षणभर विरंगुळा मिळावा. त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे असा हेतू ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कोथरूड परिसरातील माझ्या भगिनींचा मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापुढेही असेच उपक्रम राबविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
- अमोल बालवडकर (माजी नगरसेवक, तथा संस्थापक अमोल बालवडकर फाउंडेशन)
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य