Amol Balwadkar Foundation | पाषाणमध्ये अडीच हजार महिलांच्या उपस्थितीत खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमोल बालवडकर फाउंडेशनचा उपक्रम
कोथरूड (पुणे) : Amol Balwadkar Foundation | उखाणे , गप्पागोष्टी सोबत मंगळागौरीची गाणी असे खेळीमेळीचे वातावरण रंगले. सोबत भरघोस बक्षिसांची लयलूट होती. अशा आनंददायी वातावरणात पाषाण येथे खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम पार पडला. अडीच हजार महिलांनी या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शवली. अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित खेळ रंगला पैठणीचा तसेच महिलांचा मेळावा ज्ञानदीप मंगल कार्यालय, पाषाण येथे (दि.१) आयोजित करण्यात आला होता. यासोबतच महिलांसाठी मनोरंजन म्हणून मंगळागौर आणि लकी ड्रॉ चे देखील आयोजन करण्यात आले होते. पाषाण परिसरातील भगिनींनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा मनसोक्तपणे आनंद लुटला. या कार्यक्रमात अभिनेत्री अभिज्ञा भावे यांची विशेष उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सादरीकरण अँकर आर. जे. अक्षय यांनी केले.
या कार्यक्रमात अडीच हजार पेक्षा जास्त महिलांनी सहभाग दर्शविला. कार्यक्रमाच्या दरम्यान बालेवाडी परिसरातील दिव्यांग सहकारी प्रमोद लहाने यांना हॅंडीकॅप बाईक भेट स्वरूपात देण्यात आली. कार्यक्रमासाठी अमोल बालवडकर फाउंडेशनच्या पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
…आणि महिला हरखून गेल्या
यावेळी प्रत्येक महिलेस आकर्षक भेट वस्तू आणि ‘लकी ड्रॉ’ स्पर्धेत पहिल्या पाच विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण देखील करण्यात आले. कार्यक्रमाचा आनंद सोबत भरगोस बक्षीसे यामुळे महिला भगिनी अक्षरशः हरखून गेल्या होत्या. लकी ड्रॉ स्पर्धेच्या अंतर्गत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस टीव्हीएस स्कुटी झेस्ट . अयोध्या कदम यांना देण्यात आले. दुसरे बक्षीस सॅमसंग एलइडी टीव्ही कल्पना संजय मुरगूडकर, तिसरे बक्षीस फ्रिज जनाबाई शामू थोपे, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन रुक्साना पाशान यांना आणि पाचवे बक्षीस मिक्सर रेणुका निर्मल यांना देण्यात आले.
खेळ रंगला पैठणीचा तसेच महिलांचा मेळावा पाषाण मध्ये घेण्यात आला.
अशा कार्यक्रमातून आपल्या भागातील महिला भगिनींचे प्रश्न देखील समजतात आणि त्याचे निराकरण करता येते.
शिवाय त्यांना एक व्यासपीठ देखील मिळते.
या कार्यक्रमाला पाषाण परिसरातील माझ्या भगिनींचा मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यापुढेही असेच उपक्रम राबविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. (Amol Balwadkar Foundation)
- अमोल बालवडकर (माजी नगरसेवक, तथा संस्थापक अमोल बालवडकर फाउंडेशन)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक