Amol Balwadkar Foundation | ऑलिम्पिकची ‘दहीहंडी’ फोडून मेडल पटकावणाऱ्या स्वप्नील कुसळे यांचा अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने जाहीर सत्कार

Amol Balwadkar

पुणे : Amol Balwadkar Foundation | अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने बालेवाडी हायस्ट्रीट ग्राऊंड (Balewadi High Street Ground) येथे काल (दि.२७) भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. राज्यभर दहीहंडी उत्सवाचा (Dahi Handi 2024) उत्साह मंगळवारी शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील भाजपा नगरसेवक अमोल बालवडकर आयोजित दहीहंडी उत्सव सोहळ्यादरम्यान पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये शूटिंग प्रकारात कास्यपदक पटकावणारे महाराष्ट्राचे सुपुत्र स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) यांचा सत्कार देखील करण्यात आला.

दरम्यान ऑलिम्पिकची दहीहंडी फोडून मेडल पटकावणाऱ्या आघाडीचा नेमबाज स्वप्निल कुसळे यांनी गोविंदांबरोबर जल्लोष केला. जय श्रीराम म्हणून हिंदू संस्कृतीचं भक्कमपणे रक्षण केलं, तरचं हिंदूराष्ट्र मोठं होईल असे म्हणत हिंदू संस्कृतीचं रक्षण करण्याचे आवाहनही स्वप्निल कुसळे यांनी केले.

यावेळी बाणेर बालेवाडी (Baner-Balewadi) इथल्या रहिवाशांनी नेमबाज स्वप्निल कुसाळे यांना पाच लाख रुपये किंमतीचा चेक दिला. यावेळी आयोजक माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले “आजची दहीहंडी ही खूप ऐतिहासिक आहे. महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने ७२ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये ज्यानं कोणी दहीहंडी फोडली असेल, तो आपला स्वप्नील असून आज आम्हाला खूपच आनंद होत आहे. आम्ही आमच्या बालेवाडी येथील नागरिकांकडून स्वप्नील याला प्रेमाची मदत करत आहोत”, असे बालवडकर यांनी सांगितले.

यावेळी डि.जे. परफॉर्मन्ससाठी आलेल्या KRATEX A-Y0 आणि SFX and PYRO Effects ने दहीहंडीच्या उत्सवात अधिक भर घातली आणि बालकृष्णाच्या विविध गाण्यांवर थिरकण्यास सर्वांना भाग पाडले. (Amol Balwadkar Foundation)

तसेच विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत थरावर थर रचून उपस्थितांची मने जिंकली.
या भव्य उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, महाळुंगे पंचक्रोशीतील तसेच कोथरूड मतदारसंघ,
पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातून असंख्य बालगोपालांसह गोविंदा पथक आणि नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान

You may have missed