Amol Balwadkar | पुणे : प्रभाग 09 मध्ये ‘अमोल बालवडकर’ ब्रँडचा झंझावात; फेरमतमोजणीत अमोल बालवडकर यांचे मताधिक्य वाढले

Amol Balwadkar | Pune: A storm of 'Amol Balwadkar' brand in Ward 09; Amol Balwadkar's vote share increased in the recount

पुणे : Amol Balwadkar | सर्वात शेवटी मतमोजणी सुरु झालेल्या व सर्वाधिक मतदान झालेल्या शहरातील सर्वाचे लक्ष वेधून घेणार्‍या प्रभाग क्रमांक ९ सुस-बाणेर-पाषाण-म्हाळुंगे  या ठिकाणी अमोल बालवडकर यांनी आपला ‘अमोल बालवडकर’ ब्रँड सिद्ध करुन दाखविला. शहरातील सर्वात शेवटचा मध्यरात्री पावणे दोन वाजता हा निकाल जाहीर झाल्यानंतर पुणे शहरातील महापालिका मतमोजणी अधिकृतपणे संपली. अमोल बालवडकर हे सुरुवातीला नियमित मतमोजणी संपली. तेव्हा ६५० मतांनी विजयी झाले होते. मात्र, भाजपने शेवटचा प्रयत्न म्हणून शेवटच्या तीन फेर्‍यांची फेरमतमोजणी करण्याची मागणी केली. निवडणुक अधिकार्‍यांनी सुरुवातीला केवळ ९ व्या फेरीची मागणी मान्य केली. त्यानंतरही भाजपकडून दबाव वाढविण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर ७ व ८ फेरीच्या फेरमतमोजणी करण्यात आली. त्यात उलट अमोल बालवडकर यांचे मताधिक्य वाढून ते ९०३ इतके झाले.

https://www.instagram.com/p/DTmbpvjjC-H

अमोल बालवडकर यांना ३५ हजार ६०४ मते मिळाली तर, भाजपचे लहू बालवडकर यांना ३४ हजार ७०१ मते मिळाली. भाजपमधील अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे शहरात सर्वाधिक चर्चेचा प्रभाग ९ ठरला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अमोल बालवडकर यांनी सूस, बालेवाडी, पाषाण, बाणेर, म्हाळुंगे या त्यांच्या भागातून भाजपाला मोठी आघाडी मिळवून दिली होती. विधानसभेसाठी ते इच्छुक होते. परंतु, कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर विधानसभेत त्यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन पाटील यांना पाठिंबा दिला. त्यांचा जोरात प्रचार केला. तरीही आपल्याला प्रतिस्पर्धी नको, म्हणून अमोल बालवडकर यांचा शेवटच्या क्षणी पत्ता कट करण्यात आला. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला.

अमोल बालवडकर यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे बाणेर, बालेवाडी, पाषाण आणि म्हाळुंगे येथील भाजपचे कार्यकर्तेही पक्षावर नाराज झाले. अनेक भाजप कार्यकर्त्यांनी अमोल बालवडकर यांना पाठिंबा दिला. कधीही राजकारणात सक्रिय नसलेल्या अनेक आय टी क्षेत्रातील मान्यवरांनी अमोल बालवडकर यांना पाठिंबा देणारे व्हिडिओ स्वत:हून व्हायरल केले.

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व शहर भाजपने ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. एका बाजूला अमोल बालवडकर आणि दुसरीकडे संपूर्ण भाजप अशीही लढत रंगली होती. चंद्रकांत पाटील यांनी या प्रभागातील घरोघरी जाऊन  भाजपचा प्रचार केला. विधानसभा निवडणुकीत ते जितके फिरले नाही, इतके या प्रभागात महापालिका निवडणुकीत दारोदार फिरले. या प्रभागात भाजपच निवडून येणार अशी भविष्यवाणी केली होती.

बालवडकर यांनी आपल्या अमोल बालवडकर फॉऊंडेशनच्या मार्फत गेली काही वर्षे या भागात मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य केले आहे. दिवाळीमध्ये नागरिकांसाठी सरंजाम योजना आखून लोकांच्या घराघरात दिवाळी गोड करत आले आहे. बालेवाडी, बाणेरमधील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून त्यांनी स्वत:चे वॉर्डन नेमून कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. पाणी टंचाईवर उपाय योजना केली. त्याचा परिणाम म्हणून या भागात अमोल बालवडकर ब्रँड तयार झाला  आहे. या अमोल बालवडकर ब्रँडच्या जोरात त्यांनी सर्वशक्तीमान भाजपशी यशस्वी टक्कर देत विजय खेचून आणला.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांची असते, असे म्हटले जाते. तरीही प्रभाग पद्धतीमुळे मतदारसंघ मोठा झाल्याने पक्षाच्या तिकीटाला अधिक महत्व आले आहे. परंतु, घराघरापर्यंत सामाजिक कार्य पोहविलेले अमोल बालवडकर यांच्यासारखे कार्यकर्ते आपला स्वत:चा ब्रँड तयार करुन शक्तीशाली पक्षालाही नमविण्यात यशस्वी होऊ शकतात, हे अमोल बालवडकर यांनी दाखवून दिले आहे.

या प्रभाग ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदेरे यांनी भाजपचे गणेश कळमकर यांचा पराभव केला. त्याचवेळी भाजपच्या रोहिणी चिमटे यांनी राष्ट्रवादीच्या गायत्री मेढे यांचा पराभव केला. तसेच भाजपच्या मयुरी कोकाटे यांनी राष्ट्रवादीच्या पार्वती निम्हण यांचा पराभव केला.

You may have missed