Amol Balwadkar | ‘कोथरुडमधून चंद्रकांत पाटलांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार’, अमोल बालवडकरांचा देवेंद्र फडणवीसांना शब्द; म्हणाले…

Amol Balwadkar

पुणे: Amol Balwadkar | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघात (Kothrud Assembly Election 2024) भाजप नेते (BJP Leader) अमोल बालवडकर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. तशी त्यांनी तयारीही केली होती. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तसेच समाजपयोगी उपक्रमातून बालवडकर मतदारसंघातील घराघरात पोहोचले आहेत.

या मतदारसंघात भाजप अमोल बालवडकर यांना उमेदवारी देईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र भाजपने विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मतदारसंघात नाराजीनाट्य पाहायला मिळाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मतदारसंघात भेट देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अमोल बालवडकर निवडणूक लढण्यावर ठाम होते.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मध्यस्थी केल्यानंतर अमोल बालवडकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर आता फडणवीस यांची अमोल बालवडकर यांनी मुंबईत सागर बंगल्यावर भेट घेतली. त्यावेळी आगामी विधानसभेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी प्रसिद्ध व्यवसायिक हेरंब शेळके, समित कदम, विक्रम विनोदे, सागर बालवडकर, नरेंद्र बालवडकर, विक्रम साखरे आदी उपस्थित होते.

या भेटीनंतर अमोल बालवडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आज माझे नेते महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक भेट ही प्रेरणा देणारी असते, आजची भेट ही तशीच प्रेरणादायी होती.

१० वर्ष पक्षाचे तन-मन-धनाने अथक काम केल्यानंतर मी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरुड मतदारसंघातून इच्छुक होतो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माझ्या इच्छेचा सन्मान करून निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले, नेत्याचा आदेश ‘सर आँखो पर’ प्रमाणे ते मान्य केले. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्रजी यांनी आज भेट दिली.”

ते पुढे म्हणाले, संघटन हीच शक्ती आहे आणि भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांच्या कार्याचा योग्यवेळी योग्य तो सन्मान केला जाईल असे देवेंद्रजी म्हणाले आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघ येथून चंद्रकांत दादा पाटील यांना बहुमताने निवडून येण्यासाठी अथक परिश्रम करण्याचा शब्द ही देवेंद्रजी यांना दिला असल्याचेही बालवडकर यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 | कोथरूडमध्ये आजी- माजी आमदारांमध्ये लढत ! मनसे उमेदवार कशापद्धतीने आपला रंग भरणार? राजकीय वर्तुळात चर्चा; चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघातील गाठीभेटी वाढल्या

Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…

Sharad Pawar On Maharashtra Finance Situation | ‘एक-दोन महिन्यांमध्ये राज्याची खरी आर्थिक स्थिती समोर येईल’,शरद पवारांकडून चिंता व्यक्त, म्हणाले – ‘फडणवीसांवर विश्वास पण…’