Amol Kolhe On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत 180 ते 190 जागा महाविकास आघाडी जिंकणार; अमोल कोल्हेंचा मोठा दावा

Amol Kolhe

आंबेगाव : Amol Kolhe On Maharashtra Assembly Election 2024 | खासदार अमोल कोल्हे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतील जागांबाबत महत्वाचे विधान केले आहे. माध्यमांशी बोलताना कोल्हे म्हणाले, ” इतर पक्षातील कार्यकर्ते महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) येण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र इतर पक्षातील कार्यकर्त्यांना का घ्यायचे हा प्रश्न आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा अवमान करणार नाही, असे सांगून विधानसभा निवडणुकीत १८० ते १९० जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा दावा त्यांनी केला.

आंबेगाव तालुक्यात महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून आज जनता दरबारास आम्ही सर्व एकत्र आलो असून पुढील आमदार हा महाविकास आघाडीचा असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रेचे नियोजन केले असून त्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले. (Sharad Pawar NCP)

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात (Ambegaon Shirur Assembly) आज (दि.१०) मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरद पवार सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, बाळासाहेब बाणखेले, सुरेखा निघोट, पूजा वळसे पाटील, धोंडिभाऊ भोर, संजय बढेकर, विशाल वाबळे, दत्ता गांजाळे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज व शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता ते म्हणाले, ” आजच्या जनता दरबाराला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. जनता दरबार म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना नेत्याशिवाय अथवा शिफारशी शिवाय थेट प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा दुवा आहे. ज्या जनतेने प्रेम दिले, विश्वास दिला. विपरीत परिस्थितीत ठामपणे पाठीशी उभी राहिली, त्यांच्या प्रति कृतज्ञता दाखवण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन केले होते, असे कोल्हे म्हणाले. (Amol Kolhe On Maharashtra Assembly Election 2024)

ते पुढे म्हणाले, “महसूल, रस्ते, वीज मंडळ, पोलीस यासंदर्भात अनेक समस्या समोर आल्या आहेत.
संबंधित विभागांना या समस्यांचे निराकरण करण्याची सूचना केली,
यावर काय कार्यवाही केली या संदर्भात सात दिवसात अहवाल मागितला आहे.
माझी लाडकी बहीण योजनेबरोबरच शेतकऱ्यांच्या दुधाला, शेतीमालाला चांगला दर दिला तर चांगले होईल.
माझी लाडकी बहीण योजना चालू राहण्याची जबाबदारी युती सरकारने घेतलेली नाही.
केवळ तीन महिन्याचे पैसे मिळतील पुढे काय होईल, याबाबत माहित नाही, असे त्यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed