Amol Kolhe On Union Budget | “घालीन लोटांगण वंदीन बिहार” अर्थसंकल्पावर अमोल कोल्हेंची टीका म्हणाले – “देशाचं की बिहार-आंध्र प्रदेशचं बजेट…”

Amol Kolhe-Nirmala Sitharaman

मुंबई : Amol Kolhe On Union Budget | अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज (दि. २३ ) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारमण यांच्यासमोर महागाई नियंत्रणात ठेवत आर्थिक विकासाला चालना देण्याचं आव्हान होतं. तसंच मध्यमवर्गीयांसाठी कोणतेही मोठे धोरण बदल किंवा नवीन फायदे या संदर्भाने सर्वांचं लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे लागले होते.

या अर्थसंकल्पात मित्र पक्ष असलेल्या नितीश कुमारांच्या बिहार आणि चंद्राबाबूंच्या आंध्रप्रदेशच्या पदरात अनेक गोष्टी टाकलेल्या आहेत. अर्थसंकल्पात या दोन राज्यांना मोठा निधी देण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) खासदार अमोल कोल्हे यांनी निशाणा साधला आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा सरकार टिकवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

अपेक्षेप्रमाणे या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशला केंद्र सरकारकडून मोठं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. पण यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आलं नाही. यावरून अमोल कोल्हे यांनी गणेशाच्या आरतीच्या स्वरूपात या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

अमोल कोल्हे यांनी विडंबनात्मक कविता करत ट्विट मध्ये म्हंटलेय की,

घालीन लोटांगण वंदीन बिहार,
डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे,
दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र,
सरकार वाचवेन म्हणे नमो !!

ते म्हणाले, “यंदाचा अर्थसंकल्प हा सरकार वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. जेडीयू आणि टीडीपी या दोन कुबड्यांचा आधारावर म्हणजेच या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून आंध्र प्रदेश आणि बिहारला खैरात देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना अधिक निधी मिळाला यात दुःख वाटण्याचे कारण नाही. पण त्याचवेळी देशात सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पान पुसली आहेत”, अशी टीका कोल्हे यांनी केली.

केंद्रसरकारने बिहार बाबत घोषणा करताना बिहारमध्ये नवीन विमानतळ, क्रिडांगण, रुग्णालये उभारण्याची घोषणा केली आहे. शिवाय कौशल्य विकास केंद्र बिहारमध्ये उभारले जाणार आहे. बिहारमधील रस्त्यांसाठी २६ हजार कोटी दिले जाणार आहेत. त्याच बरोबर बिहारमध्ये नवा पॉवर प्रोजेक्ट उभारला जाईल. पूर नियंत्रणासाठी विशेष निधीची तरतूदही करण्यात आली आहे. पर्यटनाच्या विकासातही बिहारला झुकते माप देण्यात आले आहे. गया इथल्या मंदिरांचा विकास केला जाणार आहे. शिवाय नालंदा विद्यापीठाला पर्यटन केंद्र बनवले जाईल. बिहारमध्ये महाबोधी कोरीडोअर बनवण्यात येईल.

तर केंद्रसरकारने आंध्र प्रदेशच्या बाबतीत १५ हजार कोटींचा विशेष निधी मंजूर केला आहे.
या शिवाय आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच्या विकासासाठीही मोठा निधी दिला जाईल असे सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे.
आंध्र प्रदेशला या अर्थ संकल्पात विशेष महत्व दिले गेले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Puja Khedkar | UPSC ने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर नॉट रिचेबल; पुणे पोलिसांनी समन्स बजावूनही उपस्थित नाहीत

Pune Crime News | आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; एकास अटक

Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य

You may have missed