Amravati Assembly Constituency | पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन; आता सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत

अमरावती: Amravati Assembly Constituency | अमरावती विधानसभा मतदारसंघातील आमदार सुलभा खोडके (Sulbha Sanjay Khodke) यांच्यावर काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली आहे (Congress Suspended MLA). त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांचं पक्षामधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.
https://www.instagram.com/p/DBA9cYUi9FC
काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी दिलेल्या सूचनेनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ही कारवाई केली आहे. मागच्या काही काळापासून सुलभा खोडके ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. (Ajit Pawar NCP)
https://www.instagram.com/p/DBBELqmCMkO
तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये सुलभा खोडके यांचाही समावेश असल्याचा दावा केला जात होता. त्यातच त्यांनी अमरावतीमध्ये जोरदार बॅनरबाजीही केली होती. त्यानंतर आता सुलभा खोडके यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सुलभा खोडके या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
https://www.instagram.com/p/DBBZTltiYEa
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार