Anant-Radhika Wedding | सोनिया गांधी, राहुल… कोणा-कोणाला मुकेश अंबानी यांनी दिले निमंत्रण, ही आहे गेस्ट लिस्ट

नवी दिल्ली : Anant-Radhika Wedding | भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह १२ जुलै रोजी हिरे व्यावसायिक कुटुंबातील कन्या राधिका मर्चंट (Anant Ambani- Radhika Merchant Wedding) हिच्यासोबत होणार आहे. ३ जुलैपासून मुकेश अंबानी यांचे घर अँटेलिया येथून विधी सुरू होतील. विवाहाचे निमंत्रण देखील लोकांच्या घरी पोहोचू लागले आहे. व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, बडे राजकीय नेते, क्रिकेटर, हॉलिवुड आणि बॉलिवुड स्टारला निमंत्रित केले जात आहे.
काही लोकांना मुकेश अंबानी यांनी स्वता जाऊन लग्नपत्रिका दिली आहे. या मोठ्या विवाह सोहळ्यात अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, रणवीर कपूर, आलिया भट्ट, एमएस धोनी आणि अनेक बिझनेस दिग्गज सहभागी होऊ शकतात.
गुरुवारी मुकेश अंबानी हे सोनिया आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी गेले होते. असे म्हटले जात आहे की, त्यांनी अनंत-राधिका यांच्या लग्नात दोघांना आमंत्रित केले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विवाहाचे निमंत्रण दिले आहे. आणखी काही मोठ्या राजकीय नेत्यांना अंबानी यांनी निमंत्रण दिले आहे.
इंडिया टुडेच्या माहितीनुसार, अनंत आणि राधिकाच्या विवाहाच्या एक दिवसानंतर १३ जुलै रोजी अंबानी कुटुंबाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यात ६० नृत्य कलाकार आपली कला सादर करतील.
दरम्यान, अनंत-राधिकाची लग्नपत्रिका सुद्धा सध्या चर्चेत आहे.
ही पत्रिका ६-७ लाख रुपये असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
निमंत्रण पत्रिका सोनेरी रंगाच्या बॉक्समध्ये आहे, बॉक्स उघडल्यानंतर भगवान विष्णुंचे छायाचित्र दिसते,
ते बाजूला केल्यानंतर मंत्र ऐकू येतो. यानंतर आणखी उघडल्यानंतर एक चांदीचा बॉक्स दिसतो,
ज्यामध्ये काही भेटवस्तू आणि निमंत्रण पत्रिका ठेवलेली आहे.
या बॉक्समध्ये गणपतीपासून राधा-कृष्ण पर्यंत छोट्या मूर्ती आहेत, ज्या सोने आणि चांदीच्या आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर