Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
पुणे : Andekar Gang History | गेल्या 4 दशकापासून नाना पेठ (Nana Peth Pune) परिसरात आपली दहशत निर्माण करणार्या आंदेकर टोळीचा इतिहास हा रक्तरंजितच आहे. तुम्ही दुसर्याचे रक्त काढले तर तुमचेही कोणीतरी रक्त काढल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले जाते. वनराज आंदेकर याच्या निर्घुण खुनाने (Vanraj Andekar Murder Case) हे वचन पुन्हा एकदा प्रत्ययास आले. आंदेकर कुटुंबाचा इतिहास असाच रक्तरंजित आहे.
https://www.instagram.com/reel/C_Z0rsiJdtk/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
पुणे शहरात पूर्वी अनेक छोट्या मोठ्या टोळ्या होत्या. त्यात बाळकृष्ण ऊर्फ बाळु आंदेकर (Balkrishna Alias Balu Andekar) याची टोळी होती. मटका, जुगार, गावठी दारुची विक्री करुन त्यातून पैसा कमावणे हे प्रामुख्याने या टोळ्यांचे उद्योग असत. या टोळ्या एकमेकांवर हल्ला करण्यासाठी सायकलची चैन, तलवारी, रामपूरी चाकू, सोडा वॉटरच्या बाटल्या यांचा वापर करीत असे. (Andekar Gang History)
https://www.instagram.com/p/C_ZqLsSvWiZ
टोळी युद्ध सुरु
आंदेकर आणि माळवदकर यांची सुरुवातीला एकच टोळी होती. वादातून प्रमोद माळवदकर (Pramod Malvadkar) वेगळा झाला. 1980 च्या दशकात बाळु आंदेकर आणि प्रमोद माळवदकर या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु झाली. आंदेकर टोळीने प्रमोद माळवदकर याच्या वडिलांचा खून केला. त्याचा बदला घेण्यासाठी माळवदकर टोळीने शिवाजीनगर येथील कोर्टाच्या (Shivaji Nagar Court Pune) आवारात बाळू आंदेकर याचा 17 जुलै 1984 रोजी खून केला. त्यातून या दोन टोळ्यांमधील गँगवॉर (Gangwar In Pune) आणखीच भडकले. पुणे शहरातील आतापर्यंतचे हे भीषण गँगवॉर होते. या गँगवॉरमध्ये 6 गुंड मारले गेले होते. जवळपास 10 वर्ष हे गँगवॉर अधूनमधून डोके वर काढत होते.
https://www.instagram.com/p/C_YaceiPW64
शहर पोलीस (Pune Police) दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने (Pune Crime Branch) काळेवाडी येथे 19 नोव्हेबर 1997 रोजी पहाटे प्रमोद माळवदकर याचा इन्काऊंटर केला. या चकमकीत तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकाच्या दंडाला गोळी चाटून जाऊन ते जखमी झाले होते.
https://www.instagram.com/p/C_YkEARJkxe
प्रमोद माळवदकर याच्या मृत्युनंतर माळवदकर टोळी जवळपास नामशेष झाली. त्यातून माळवदकर – आंदेकर टोळीयुद्ध थांबले असले तरी आंदेकर टोळी मात्र वेगाने वाढू लागली होती. बाळू आंदेकर याच्यानंतर सूर्यकांत ऊर्फ बंडु आंदेकर (Suryakant Alias Bandu Andekar) याच्याकडे आंदेकर टोळीची सुत्रे गेली.
राजकारणात एंट्री
इतके दिवस केवळ गुन्हेगारी (Pune Crime World) विश्वातच ही टोळी आपले वर्चस्व राखून होती. १९९७ मध्ये महापालिकेच्या निवडणुका (PMC Election) आल्या. या निवडणुकीद्वारे आंदेकर टोळीने थेट राजकारणात प्रवेश केला. या टोळीशी संबंधित चार जण निवडून आले होते. त्यातून पुढच्याच वर्षी 1998- 99 मध्ये वत्सला आंदेकर (Vatsala Andekar) यांची पुण्याच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती. वत्सला आंदेकर या अक्का म्हणून ओळखल्या जात असे. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रातील आपल्या निकटवर्तीयांशी संबंध कमी केले.
पण आंदेकर बंधुंचे वर्चस्व वाढत होते. त्यातूनच कोणी विरोध केला तर त्याला मारण्यासाठी गुंड पाठविणे, त्यासाठी सुपारी देणे असे प्रकार आंदेकर टोळीकडून होत होते. त्यातूनच फरासखाना पोलीस ठाण्यातील (Faraskhana Police Station) एका खून प्रकरणात सूर्यकांत ऊर्फ बंडु आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर काही काळ आंदेकर टोळीचा वरचष्मा कमी होऊ लागला होता. बंडु आंदेकर आत असताना त्याचा मुलगा वनराज व कृष्णा हे टोळी चालवू लागले. त्यातूनच मग त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली होती. आंदेकर टोळीवर नियंत्रण आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहिला. त्यातूनच वनराज आणि कृष्णा आंदेकर या दोन भावांना 2009 मध्ये एकाचवेळी तडीपार करण्यात आले होते.
राजकारणात आलेल्या आंदेकर कुटुंबाने आपले वर्चस्व नाना पेठेत कायम ठेवले.
वनराज आंदेकर याचे चुलते उदयकांत आंदेकर (Udaykant Andekar) हे 1992 मध्ये नगरसेवक झाले होते. वनराज आंदेकर याची आई राजेश्री आंदेकर या 2007 आणि 2012 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. वनराज आंदेकर हाही 2017 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आला होता. (Andekar Gang History)
बंडु आंदेकर हा जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आल्यावर आंदेकर टोळीचे वर्चस्व पुन्हा वाढू लागले.
त्याचवेळी इतर टोळ्याही आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करु लागले होते.
त्यामुळे या टोळ्यांचा आंदेकर टोळीशी संघर्ष सुरु झाला.
त्यातून खून, खूनाचा प्रयत्न, हाणामारी, खंडणी वसुली असे गुन्हे दाखल होऊ लागले.
त्यातून बंडु आंदेकर याच्यावर किमान तीन वेळा मोक्का कारवाई करण्यात आली. (MCOCA Action On Andekar Gang)
आंदेकर टोळीवर अनेक गुन्हे दाखल झाले तरी त्यांच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी नागरिक पुढे येत नाही.
आलेच कोर्टात ते टिकत नाही. त्यामुळे अनेक खटल्यांमध्ये त्यांची पुराव्या अभावी सुटका होते.
आंदेकर टोळीने नव्याने आलेल्या अनेक टोळ्यांशी संघर्ष केला आहे.
त्यात अतुल कुडले, सुरज ठोंबरे या नव्या टोळ्यांचा समावेश आहे.
आंदेकर टोळीने अनेकांना संपविले किंवा संपविण्याचा प्रयत्न केला.
पण वनराज आंदेकर याचा खून हा त्यांच्या कौटुंबिक वादातून झाला.
इतर टोळ्यांबरोबर लढता लढता आता आंदेकर कुटुंबाला कुटुंबातील संघर्षाला तोंड द्यावे लागणार असे दिसून येते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद