Anil Deshmukh Book | ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’, अनिल देशमुखांचे पुस्तक लवकरच बाजारात; विधानसभेपूर्वी आणखी गौप्यस्फोट होणार?

Diary of Home Minister

मुंबई : Anil Deshmukh Book | माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) नेते अनिल देशमुख यांचे ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ (Diary of Home Minister) हे पुस्तक बाजारात येत आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Maharashtra Assembly Election 2024) महाराष्ट्रात मोठे राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीलाही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना गौप्यस्फोट करू शकतात. दरम्यान आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुस्तक लवकरच भेटीस येत असल्याने राजकीय वातावरण तापणार असल्याची चिन्हे आहेत.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख ११ महिने तुरुंगात होते. ते षडयंत्र काय होते ? हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आहे. स्वतः देशमुख यांनी याबाबत पुस्तक लिहिले असून विधानसभा निवडणुकीपूर्वी हे पुस्तक मेहता पब्लिकेशन कडून प्रसिद्ध होत आहे. यात अनेक खुलासे आणि धक्कादायक माहिती असण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी पुराव्याशिवाय गैरप्रकाराचे आरोप केले होते. या आरोपांमुळे देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. गाडीने त्यांच्या घरावर छापे घातले होते. नंतर राज्यातील सरकार बदलले. हे प्रकरण देशभर गाजले होते.

देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप भाजप नेते करीत होते.
प्रत्यक्षात आरोपपत्रात १ कोटींच्या रक्कमेचा समावेश होता.
आरोप कर्ते परमबीर सिंह यांनीही त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नसल्याचे आणि ऐकीव माहितीवर आरोप केल्याचे सांगितले होते.

त्यामुळे हे प्रकरण खरेच होते की अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्यासाठी किंवा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
यांचे सरकार उलथवण्यासाठी रचलेले षडयंत्र होते? असा प्रश्न विचारला जात होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed