Anil Deshmukh On Devendra Fadnavis | ‘आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला असा…’ अनिल देशमुखांचे फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले – ‘अजित पवारांवर खोटा…’
मुंबई : Anil Deshmukh On Devendra Fadnavis | अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) याच्या गूढ मृत्यूआधी एकेकाळी त्याची मॅनेजर असलेली दिशा सालियन (Disha Salian Suicide Case) हिच्या आत्महत्येवरून संशय व्यक्त केला जातो. याबाबत आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि अनिल परब (Anil Parab) यांना अडकवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काही लोकांनी दबाव टाकला होता, असा धक्कादायक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांनी केला. नागपुरात बोलताना त्यांनी हा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
महत्वाची बाब म्हणजे अनिल देशमुख यांनीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना श्याम मानव यांनी केलेल्या सर्व आरोपांत पूर्णपणे तथ्य असून आपल्याकडे याचे सर्व पुरावे आहेत आणि वेळ आल्यावर आपण हे सर्व पुरावे सादर करू असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणावरून आता राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुख म्हणाले, ” तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझं देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणं करून दिले. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला. त्यातल्या चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र करून देण्यास मला सांगण्यात आले. ते जर मी करून दिलं असतं तर तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार (Ajit Pawar) अडचणीत आले असते “, असा दावा देशमुख यांनी केला आहे. (Anil Deshmukh On Devendra Fadnavis)
ते पुढे म्हणाले, ” त्यांनी मला सांगितले होते की उद्धव ठाकरेंवर मी खोटा आरोप लावायचा की त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे जमवायला सांगितले. दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंवर असा आरोप लावायला सांगितले की आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि तिला गॅलरीतून ढकलून दिले.
अजित पवारांवर गुटख्याच्या बाबतीत खोटा आरोप लावायचा,
अनिल परबांवरही खोटा आरोप लावायचा असे मला सांगण्यात आले.
मी त्याला नकार दिल्यामुळे माझ्यावर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली”, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
” तसेच देवेंद्र फडणवीस यांनी नंतर सांगितलं की अजित पवार तुमच्या पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री आहेत.
त्यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र देण्यास अडचण असेल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे,
अनिल परब यांच्यावर आरोप करा ” असेही देशमुख यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक
Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद