Anjali Damania On Ajit Pawar | राज्याच्या राजकारणात आज मोठा गौप्यस्फोट! अंजली दमानिया म्हणाल्या – अजित पवारांकडे इतका पैसा येतो कुठून?

Anjali-Damania-On-Ajit-Pawar

मुंबई : Anjali Damania On Ajit Pawar | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. दमानिया यांनी थेट अजित पवार यांच्या अर्थिक साम्राज्यावर नेम धरला असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी दमानिया यांच्या कौटुंबिक परदेश वारीवरून अतिशय खालच्या स्तराची टीका केली होती, यानंतर दमानिया पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. (Anjali Damania On Ajit Pawar)

अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण विधानसभा निवडणूक जवळ आली असताना अशाप्रकारे एखादे प्रकरण पुन्हा बाहेर आल्यास ते महायुती तसेच अजित पवारांसाठी अडचणीचे ठरू शकते. दरम्यान, दमानिया यांनी आज दुपारच्या पत्रकार परिषदेची माहिती दिली, यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, मी आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेद्वारे मी सर्व आरोपांना उत्तर देईन व काहींना धडा शिकवणार आहे. माझा लढा हा अजित पवार, सुनील तटकरे, एकनाथ खडसे व नितीन गडकरींविरोधात आहे. मी गेल्या 11 वर्षांपासून त्यांच्याविरोधात लढत आहे. हल्ली अनेक पक्षांमधील नेते त्यांची बाजू मांडण्यासाठी, त्यांच्यावरील टीकेला व टीकाकारांना उत्तर देण्यासाठी राम आणि श्याम बाळगतात. या नेत्यांवर कोणी टीका केली तर हे राम-श्याम बाहेर येऊन प्रत्युत्तर देतात.

अंजली दमानिया म्हणाल्या, देवेंद्र फडणवीसांवर कोणी टीका केली की प्रसाद लाड,
प्रवीण दरेकर बाहेर येतात. अजित पवार यांच्याविरोधात कोणी चकार शब्द काढला तरी लगेच अमोल मिटकरी, सुरज चव्हाण बाहेर येऊन वाट्टेल ते बोलतात. यांच्याकडे बोलण्याचे ताळतंत्र नाही.

अंजली दमानिया म्हणाल्या, अमोल मिटकरी माझ्याविरोधात वाईट बोलले नाहीत. कारण त्यांना कदाचित कल्पना असेल किंवा त्यांनी गुगलवर माहिती गोळा केली असेल. सुरज चव्हाण मात्र ताळतंत्र नसलेला माणूस आहे. मी या लोकांना आता सरळ करणार आहे. यांनाच नाही तर, यांच्या मालकांनाही सरळ करणार आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या, मी काय आहे हे अजित पवारांना माहीत आहे. तटकरे,
भुजबळांना देखील माहिती आहे. मी तत्त्वांवर काम करते. सुरज चव्हाणांसारख्या नव्या लोकांना काही माहिती नसते.
ते काहीही बोलतात. त्यांना अजित पवारांना दाखवायचे असते की, बघा दादा मी तुमच्यासाठी किती लढत आहे.

मी आता यांना आणि यांच्या मालकांना धडा शिकवणार आहे. तुम्ही राजकारणात येऊन
निवडणूक लढण्याच्या आधीच तुमचे राजकारण संपवणार आहे, असा इशारा दमानिया यांनी दिला.

अंजली दमानिया म्हणाल्या, आज दुपारी चार वाजता मी पत्रकार परिषद बोलावली आहे.
या पत्रकार परिषदेत मी माझ्या उत्पन्नाची माहिती देणार आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस,
सुप्रिया सुळे आणि या राज्याच्या राजकारणातील नेत्यांनी देखील त्यांच्या उत्पन्नाविषयीची माहिती द्यायला हवी.
त्यांचा उत्पन्नाचा मार्ग सांगायला हवा.

अजित पवार यांच्याकडे इतका पैसा कुठून येतो हे त्यांनी सांगायला हवे. कार्यकर्त्यांना,
पदाधिकार्‍यांना गुलाबी गाड्या देण्यासाठी पैसे येतात कुठून? हा अफाट खर्च ते कसा करतात हे
अजित पवारांनी एकदा स्पष्ट करायला हवे, अशी मागणी दमानिया यांनी केली.

न्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या मागणीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ती आमची प्राथमिकताच नाही!’

Kondhwa Pune Crime News | सहदेव महंत रामगिरी महाराजांविरोधात कोंढव्यात गुन्हा दाखल; दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग

Hadapsar Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलांनी नामांकित शाळेतील मुलींचे नग्न फोटो तयार करुन केले व्हायरल

Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन

You may have missed