Anjali Damania On BJP | सत्ता आणि विरोधी पक्षही आपलाच, भाजपची नवीन खेळी? एकनाथ शिंदे विरोधी पक्षात? दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

CM Eknath Shinde

मुंबई : Anjali Damania On BJP | राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) भूमिका पुन्हा बदलताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख विरोधी पक्षातील नेतृत्वावर शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपच्या नव्या खेळीवरून मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यातच अंजली दमानिया यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या पोस्टमुळे राजकीय गोंधळ वाढताना दिसत आहे.

आपल्या पोस्टमध्ये दमानिया म्हणाल्या, ” विरोधी पक्षच संपवण्याचा हा भाजपचाच कट आहे का? सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच. बाकी पक्ष- विरोधी पक्ष नेते अस्तित्वात ठेवायचे नाहीत. गावी जाणे, ताप येणे, पुन्हा घरी येणे, पुन्हा बरे न वाटणे ही भाजपाची स्क्रिप्ट वाटते.”

त्या पुढे म्हणाल्या, ” काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी एकदम वेगळं वागणं सुरू केलं आहे. त्यांचे सुर बदलले असून ते गावी जात आहेत, तिथे आजारी पडत आहेत, परत बरे होतात नंतर ठाण्यात परत येतात काही बैठका घेऊन परत आजारी पडतात.

आजारी पडल्याने डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे, अशी माहिती शिंदे यांच्याकडून दिली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या या वर्तमानातील बदलांमुळे विरोधी पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे”, असे अंजली दमानिया यांनी म्हंटले आहे.

महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी तेवढे संख्याबळ नाही. महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडे २९ जागा नसल्याने, विरोधी पक्षनेता पद देता येत नाही. यामुळे विरोधी पक्षातील नेतृत्वावर संकट आले आहे.

एका बाजूने भाजप आपला नेता विरोधी पक्षनेता म्हणून बसवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
तर दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीतील नेता विरोधी पक्ष म्हणून बसावा अशी मागणी केली जात आहे.
त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadki Pune Crime News | चालकाला मारहाण करुन कॅब नेली पळवून ! वाटेत दोन रिक्षा, कार, पादचार्‍याला दिली धडक

Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed