Anna Bansode | अमित शहांकडून शरद पवारांवर झालेल्या टीकेवर अजित पवार गटाचे आमदार नाराज; म्हणाले – ‘शरद पवार हे मोदींचे गुरु…’

Anna Bansode

पिंपरी : Anna Bansode | आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election 2024) भाजपची (BJP) व्यूहरचना, याचे आराखडे बांधण्यासाठी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत महाअधिवेशन पार पडले. या अधिवेशनात बोलताना अमित शहा यांनी शरद पवारांवर(Sharad Pawar) निशाणा साधत बोचरी टीका केली.

अमित शहा म्हणाले, ” भारतातील राजकारणात भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं आहे अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केली (BJP State Executive Body’s convention in Balewadi Pune).

“एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा राज्यात भाजपाची सत्ता आली तेव्हा मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळालं आहे, जेव्हा शरद पवार यांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जाते. २०१४ ला भाजपा सत्तेत आली मराठा आरक्षण आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले मराठा आरक्षण गेलं तेव्हा तुम्ही ठरवा काय करायचं ते”, असं अमित शहा यावेळी म्हणाले.

या टीकेनंतर आता मविआ कडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान या टीकेवर महायुतीतीलच (Mahayuti) अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार अण्णा बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार बनसोडे पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे माध्यमांशी बोलत होते. शरद पवार हे देशाचे नेते असून ते आमचे दैवत आहेत. भाजपाने केलेली टीका योग्य नसल्याचं मत अजित पवारांचे कट्टर समर्थक विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.

अण्णा बनसोडे म्हणाले, ” शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते भाजपनेही कबुल केलेलं आहे.
भाजपने शरद पवारांचा आदरच केला पाहिजे.
पुढे ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवार हे माझे गुरू आहेत, असं म्हटलं होतं.
यावरून भाजप नेते अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, ते योग्य नाही, अशी नाराजी अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

You may have missed