Aranyeshwar Pune Crime News | जागरण गोंधळ घालणार्‍याने घातला गोंधळ ! अरण्येश्वरचा भाई म्हणविणार्‍याने फोडल्या गाड्यांच्या काचा

Aranyeshwar Pune Crime News

पुणे : Aranyeshwar Pune Crime News | जागरण गोंधळ घालण्याचा व्यवसाय करणारा स्वत:ला अरणेश्वरचा भाई म्हणवून घेतो, त्याने पहाटे गोंधळ घालत गाड्याच्या काचा फोडल्या. अक्षय राजेश बाबर (वय १८, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, कोंढवा)असे आरोपीचे नाव आहे. (Vehicle Vandalism In Aranyeshwar Pune)

याबाबत कांचन मयूर डहाळे (वय २९, रा. संतनगर, अरण्येश्वर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police) फिर्याद दिली आहे. ही घटना अरण्येश्वर रोड वरील अरण्येश्वर दर्शन सोसायटी येथे गुरुवारी पहाटे अडीच वाजता घडली.

अक्षय बाबर याचा जागरण गोंधळचा व्यवसाय आहे. अरण्येश्वर दर्शन येथे रस्त्याच्या कडेला लावलेल्या फिर्यादी व करण किशोर खैरनार यांच्या गाडीची तोडफोड करुन ४५ हजार रुपयांचे नुकसान केले. याबाबत त्याला विचारल्यावर त्याने “मला ओळखत नाही का, माझे नाव अक्षय बाबर आहे. मी अरण्येश्वरचा भाई आहे. माझ्या नादाला लागला तर एकालाही सोडणार नाही, असे म्हणून लोकांच्या अंगावर धावून जाऊन दहशत करुन आरडाओरडा करत तेथून निघून गेला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे (PI Chhagan Kapse), पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे (PI Uttam Bhajanawale), पोलीस उपनिरीक्षक रेखा साळुंखे (PSI Rekha Salunkhe) यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक एस डी फकीर (PSI S.D. Fakir) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना

You may have missed